Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनी येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडिया पहिल्या दिवशी 185 रन्सवर ऑलआऊट झाली होती. त्यानंतर टीम इंडियाला दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 षटके टाकण्याची संधी मिळाली. या 3 षटकांमध्ये, चाहत्यांना कळले की दुसऱ्या दिवशी एक अप्रतिम खेळ पाहायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah आणि सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला. (हे देखील वाचा: IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Stumps: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 9 धावांवर गमवाली पहिली विकेट; येथे पाहा स्कोरकार्ड)
विकेट घेतल्यानंतर बुमराह-कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल
टीम इंडियाने पहिल्या दिवशी 3 षटके टाकली. या तीन षटकांमध्ये टीम इंडियाला एक विकेटही मिळाली. आणि खेळाच्या अल्पावधीतच जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात वाद पाहायला मिळाला. वास्तविक बुमराहला ओव्हर लवकर संपवायचे होते पण उस्मान ख्वाजा थोडा वेळ घेत होता, त्यामुळे बुमराह निराश झाला आणि त्याने ख्वाजाकडे हातवारे केले. नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेल्या सॅम कॉन्स्टासला वाटले की बुमराह त्याच्याकडे बोट करत आहे आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
THIS IS TEST CRICKET. 🫡
THIS IS BGT. 🍿
THIS IS CAPTAIN JASPRIT JASBIR SINGH BUMRAH. 🥶pic.twitter.com/eUJXyb1NSO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 3, 2025
उस्मान ख्वाजाला सहन करावा लागला फटका
या वादानंतर जसप्रीत बुमराहने पुढच्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजाला बाद केल्यानंतर टीम इंडियाने जल्लोष साजरा केला. यादरम्यान बुमराह आणि कोहलीनेही सॅम कॉन्स्टासवर प्रतिक्रिया दिली. ज्याचा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून 9 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजा 2 धावा करून बाद झाला. तर सॅम कॉन्स्टास 7 धावा करून नाबाद आहे.