PAK vs SL (Photo Credit- X)

PAK vs SL Super 4: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. सुपर-४ मध्ये आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक सामना खेळला असून, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुपर-४ मधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले, तर बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला. त्यामुळे, आज दोन्ही संघांना स्पर्धेतील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. या सामन्यात जो संघ हरेल, त्याचा आशिया कप २०२५ मधील पुढील प्रवास खूपच खडतर होईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही लढत 'करो या मरो' ची असणार आहे.

कधी, कुठे खेळला जाईल पाकिस्तान-श्रीलंका सामना?

आशिया कप २०२५ मधील सुपर-४ फेरीचा तिसरा सामना आज म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल. हा सामना अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. याव्यतिरिक्त, सोनी लिव्ह ॲप आणि फॅनकोडवरही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल, जिथे तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता.

हेड-टू-हेड रेकॉर्ड

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण २३ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी, पाकिस्तानने १३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेला १० सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळे हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये पाकिस्तानचे पारडे थोडे जड दिसत आहे. या दोन्ही संघांमध्ये शेवटचा टी-२० सामना २०२२ मध्ये खेळला गेला होता, त्यानंतर त्यांच्यात कोणताही टी-२० सामना झालेला नाही.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-११

पाकिस्तान साहिबजादा फरहान, सईम अयूब, फखर जमां, हुसेन तलत, मोहम्मद नवाज, सलमान आगा, फहीम अश्रफ, मोहम्मद हरिस, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद.

श्रीलंका पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कामिल मिशारा, कुसल परेरा, दासुन शनाका, कामिंडु मेंडिस, चरिथ असलंका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, चमिरा, नुवान तुषारा.