
Sanju Samson Injury Update: राजस्थान रॉयल्स आयपीएल 2025 मध्ये अत्यंत वाईट स्थितीत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद प्रमाणेच संघाने सहा सामने गमावले आहेत. ज्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याची त्यांची शक्यता खूपच कमी झाली आहे. संघाच्या खराब कामगिरीचे एक कारण म्हणजे कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) ची दुखापत. ज्यामुळे खेळू शकलेला नाही. पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे, सॅमसनने या हंगामात पहिले तीन सामने केवळ एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळला. आता संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी त्याच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.
त्यांनी सांगितले की सॅमसन तंदुरुस्त नाही आणि वैद्यकीय टीमने त्याला खेळण्याची परवानगी दिलेली नाही. त्याने या हंगामात सात सामने खेळले आहेत आणि त्याने 30 पेक्षा जास्त सरासरी आणि 140 च्या स्ट्राईक रेटने 224 धावा केल्या आहेत. बुधवारी बेंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेत झाली त्यात राहुल द्रविड म्हणाले की, 'दिल्लीविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनला काही त्रास झाला होता. त्यानंतर तो खेळू शकला नाही. तो अद्याप तंदुरुस्त नाही. आमच्या वैद्यकीय पथकाने त्याला खेळण्याची परवानगी दिली नाही.'
राहुल द्रविड म्हणाले की, 'आम्ही वैद्यकीय सल्ला घेतला होता. धोका पत्करू नये, समस्या वाढू शकते, असे वैद्यकीय पथकाने सांगितले. सॅमसनवर उपचार सुरू आहे. त्याला लवकरात लवकर परत आणण्याचा प्रयत्न करू. त्याच्या आरोग्यावर दिवसेंदिवस लक्ष ठेवत आहोत.'