दिल्ली: पंतप्रधान  सानई ताकाईची यांनी पदभार ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.आर्थिक सुरक्षितता, संरक्षण सहकार्य तसेच प्रतिभेच्या गतिशीलतेवर अधिक लक्ष केंद्रित करून भारत-जपान विशेष धोरणात्मक तसेच जागतिक भागीदारी आणखी वाढवण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांनी त्यांच्या सामायिक संकल्पनांबाबत चर्चा केली.

अधिक सशक्त भारत-जपान संबंध जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे आहेत यावर दोन्ही नेत्यांनी अनुमोदन दिले.

एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“जपानच्या पंतप्रधान सानई ताकाईची यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद झाला. पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि आर्थिक सुरक्षितता, संरक्षण सहकार्य तसेच प्रतिभेच्या गतिशीलतेवर अधिक लक्ष केंद्रित करून भारत-जपान विशेष धोरणात्मक तसेच जागतिक भागीदारी आणखी वाढवण्यासंदर्भात चर्चा केली. अधिक सशक्त भारत-जपान संबंध जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे आहेत यावर आमचे एकमत झाले.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)