WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्संसाठी अनेक नवीन वैशिष्ट्ये अपडेट करत असते. मेटा-मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने iOS वर 'टेक्स्ट डिटेक्शन' फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स थेट इमेजमधून टेक्स्ट वेगळे करू शकतील. iOS 23.5.77 अपडेटसाठी नवीन WhatsApp इन्स्टॉल केल्यानंतर कंपनी हे फीचर प्रत्येकासाठी आणत आहे.

टेक्स्ट डिटेक्शन फीचर 'असं' करणार काम -

WABetaInfo च्या अहवालानुसार, जेव्हा वापरकर्ता मजकूर असलेली प्रतिमा उघडतो. तेव्हा आता त्याला एक नवीन बटण दिसेल. जे त्याला प्रतिमेतील मजकूर कॉपी करू देईल. हे नवीन फीचर व्यू वन्समध्ये काम करणार नाही. मेसेजिंग प्लॅटफॉर्म iOS वर स्टिकर मेकर टूल आणत आहे. जे वापरकर्त्यांना प्रतिमा स्टिकर्समध्ये रूपांतरित करू देईल. (हेही वाचा -WhatsApp's New Feature: नवीन कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह न करता वापरकर्त्याला कळणार समोरच्या व्यक्तीचे नाव)

या आठवड्याच्या सुरुवातीला, WhatsApp iOS वर जागतिक स्तरावर 'व्हॉईस स्टेटस अपडेट' वैशिष्ट्य देखील आणत आहे, ज्याद्वारे वापरकर्ते व्हॉइस नोट्स रेकॉर्ड करू शकतात आणि स्टेटसद्वारे शेअर करू शकतात. सध्या व्हॉइस नोटसाठी कमाल रेकॉर्डिंग वेळ 30 सेकंद आहे.

टेक्स्ट एडिटर फीचर लवकरच सुरू होणार -

फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या अलीकडील अहवालानुसार, WhatsApp एका नवीन टेक्स्ट एडिटर वैशिष्ट्यावर काम करत आहे जे ड्रॉईंग टूलमध्ये नवीन फॉन्ट आणि टेक्स्ट फॉरमॅटिंग आणेल. याशिवाय यूजर्स टेक्स्ट बॅकग्राउंडचा रंग बदलू शकतील. यासोबतच, लवकरच व्हॉट्सअॅपवर कॅलिस्टोगा, कुरियर प्राइम, डॅमियन, एक्सो 2 आणि मॉर्निंग ब्रीझ सारखे नवीन फॉन्ट्स पाहायला मिळतील.