व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरकर्त्यांसाठी नवी माहिती आहे. व्हॉट्सअॅप लवकरच आणखी नवे आणि अद्ययावत फीचर (WhatsApp's New Feature) म्हणजे वैशिष्ट्य आणत आहे. जे iOS बीटा वर एक नवीन “चॅट लिस्टमध्ये पुश नेम” (Push name within the chat list) नावाने उपलब्ध असेल. ज्याचा वापरकर्त्यांना फायदा असा की, जेव्हा त्यांना एखाद्या अज्ञात म्हणजेच अनोळखी व्यक्तीकडून संदेश प्राप्त होईल. तेव्हा त्यांना फोन नंबर ऐवजी थेट चॅट लिस्टमध्ये समोरच्या व्यक्तीचे नाव दिसणार आहे. या फीचरमुळे युजर्सना नवीन कॉन्टॅक्ट म्हणून नंबर सेव्ह न करता अनोळखी संपर्क कोण आहे हे समजणे सोपे होईल.
व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमुळे मोठ्या ग्रुपमध्ये कोण कोण व्यक्ती आहेत याचा थेट मागोवा घेणे शक्य होणार आहे. या आधी केवळ फोन क्रमांक असल्याने समोरचा व्यक्ती नेमका कोण आहे याबाबत माहिती मिळत नव्हती. प्राप्त माहितीनुसार, हे वैशिष्ट्य सध्या काही बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहे . जे टेस्टफ्लाइट अॅपवरून iOS साठी WhatsApp बीटा ची नवी अवृत्ती (व्हर्जन) वापरतात. बीटाचे हे नवे व्हर्जन काही दिवसांत ते अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षीत आहे, असल्याचे समजते. (हेही वाचा, Meta Layoffs: मेटा या आठवड्यात आणखी हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ)
दरम्यान, मेसेजिंग प्लॅटफॉर्म iOS बीटा साठी नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे जे वापरकर्त्यांना गटांसाठी कालबाह्यता तारीख सेट करण्यास अनुमती देईल. शिवाय जेव्हा हे वैशिष्ट्य जारी केले जाईल, तेव्हा वापरकर्ते एक दिवस, एक आठवडा किंवा सानुकूल तारीख यासारख्या विविध कालबाह्य पर्यायांमधून निवड करण्यास सक्षम असतील. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांचा प्लॅटफॉर्म आता अधिक सक्षम झाल्याचे पाहायला मिळेल.
ट्विट
📱WhatsApp Feature Update: Meta-Owned Messaging Platform Rolling Out ‘Push Name Within Chat List’ on iOS Beta#WhatsApp #WhatsAppUpdate 📱https://t.co/bsAftOrNTy
— LatestLY (@latestly) March 9, 2023
WhatsApp हे एक 2009 मध्ये लॉन्च केलेले विनामूल्य, मल्टी-प्लॅटफॉर्म मेसेजिंग अॅप आहे. जे वापरकर्त्यांना फक्त Wi-Fi कनेक्शनसह व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल, मजकूर संदेश, त्यांची स्थिती शेअर करू देते . या अॅपला आकर्षक बनवणारा एक भाग म्हणजे ते विविध फोन आणि संगणक ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करते. त्यामुळे तुम्ही तुमचे संभाषण कधीही, कुठेही सुरू ठेवू शकता. हे वाय-फाय आणि सेल्युलर डेटाचा लाभ देखील एक-एक किंवा गट कॉल करण्यासाठी घेऊ शकते. महाग कॉलिंग शुल्काची आवश्यकता कमी करते. शिवाय प्रतिमा (फोटो), ऑडिओ व्हिडिओ संदेश, विचारांची देवाणघेवाण, संवाद यासाठी WhatsApp महत्त्वाची सेवा बजावते.