Swami Samarth Prakat Din 2026 Marathi Wishes: श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त तुमच्या कुटुंबाला भक्तिमय शुभेच्छा द्या.

प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट येथील मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. आजच्या दिवशी स्वामींच्या पादुकांना सुवर्णालंकारांनी सजवले जाते.

Swami Samarth Prakat Din 2026 Marathi Wishes: श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त तुमच्या कुटुंबाला भक्तिमय शुभेच्छा द्या.
स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा

"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असे अभयवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज, २० मार्च २०२६ रोजी १७० वा प्रकट दिन साजरा होत आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेच्या मुहूर्तावर साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे भाविकांचा जनसागर उसळला आहे. पहाटेपासूनच वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात विशेष अभिषेक, महापूजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसर 'श्री स्वामी समर्थ' या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

स्वामी समर्थांना भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जाते. १८५६ मध्ये ते प्रथम अक्कलकोटमध्ये प्रकट झाले होते, अशी मान्यता आहे. तेव्हापासून हा दिवस जगभरातील स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

अक्कलकोटमध्ये भक्तीचा उत्साह

प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट येथील मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. आजच्या दिवशी स्वामींच्या पादुकांना सुवर्णालंकारांनी सजवले जाते. भाविकांसाठी अन्नछत्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातूनही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा

२१ दिवसांच्या अनुष्ठानाची सांगता

अनेक स्वामी भक्तांनी २८ फेब्रुवारीपासून २१ दिवसांच्या विशेष नामजप साधनेला सुरुवात केली होती. या अनुष्ठानाची सांगता आज प्रकट दिनाच्या दिवशी होत आहे. या काळात भाविकांनी दररोज ठराविक वेळी नामस्मरण आणि गुरुचरित्राचे वाचन करून मानसिक शांती आणि स्वामींच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली.

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2026 11:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).