Ganpati | Representational image (Photo Credits: pixabay)

Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थी सणाची सुरुवात 7  सप्टेंबर पासून सुरु होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात वार्षिक हिंदू सण देशभर उत्साहात साजरा केला जातो. हा एक महत्वाचा हिंदू सण आहे, भगवान गणेशाचा जन्म साजरा करतो, गणपती हा अडथळ दूर करणारा आणि बुद्धी आणि समृद्धीचा देवता म्हणून पूज्य आहे. हा उत्सव दहा दिवस साजरा केला जातो, विशेषत: ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये, उत्सवाची सुरुवात घरांमध्ये आणि सार्वजनिक जागांवर  गणेशमूर्तींच्या स्थापनेपासून होते. भक्त बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करतात. प्रार्थना करतात आणि मोदकांसारख्या पारंपारिक मिठाई तयार करतात. उत्सवात भक्तीगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, ज्यामुळे आनंद आणि आदराचे उत्सवाचे वातावरण तयार होते. दरम्यान, भगवान गणेशाची स्थापना विशिष्ट वेळेत केली जाते. ज्याला शुभ मुहूर्त म्हणतात. दरम्यान, शहरनिहाय पुजेच्या वेळा आम्ही घेऊन आलो आहोत. हे देखील वाचा: Teachers' Day 2024 HD Images: शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी Greetings, Photos

गणेश चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त:

शहरनिहाय पूजेच्या वेळा द्रिक पंचांग नुसार, गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 पर्यंत आहे.

गणेश चतुर्थी 2024: शहरनिहाय पूजेच्या वेळा -

नवी दिल्ली - सकाळी 11:03 ते दुपारी 01:34 पर्यंत

हैदराबाद - सकाळी 11:00 ते दुपारी 01:28 पर्यंत

पुणे - सकाळी 11:18 ते दुपारी 01:47 पर्यंत

मुंबई - सकाळी 11:22 ते दुपारी 01:51 पर्यंत

गुडगाव - सकाळी 11:04 ते दुपारी 01:35 पर्यंत

नोएडा - सकाळी 11:03 ते दुपारी 01:33 पर्यंत

चेन्नई - सकाळी 10:53 ते दुपारी 01:21 पर्यंत

जयपूर - सकाळी 11:09 ते दुपारी 01:40 पर्यंत

चंदीगड - सकाळी 11:05 ते दुपारी 01:36 पर्यंत

कोलकाता - सकाळी 10:20 ते दुपारी 12:49 पर्यंत

बेंगळुरू - सकाळी 11:04 ते दुपारी 01:31 पर्यंत

अहमदाबाद - सकाळी 11:23 ते दुपारी 01:52 पर्यंत

दरम्यान, चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:37 वाजता समाप्त होईल.

गणेश चतुर्थी 2024: गणेश विसर्जन तारीख जाणून घ्या

यंदा गणेश चतुर्थीचा १० दिवसांचा उत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून मंगळवारी 17  सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे.

सकाळचा मुहूर्त - सकाळी 9:11 ते दुपारी 1 :47

मुहूर्त - दुपारी 3:19 ते 4. 51 pm

संध्याकाळ मुहूर्त - 7:51 pm ते 9:19 pm

रात्रीचा मुहूर्त - 10:47 pm ते 3:12 am,

18 सप्टेंबर चतुर्दशी तिथी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3:10 वाजता सुरू होईल आणि १७ सप्टेंबर रोजी सकाळी 11:44 वाजता समाप्त होईल.