महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे व संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी या उद्देशाने राज्य सरकारने e-KYC सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नव्या उपक्रमामुळे लाभार्थी भगिनींना आपल्या माहितीत होणाऱ्या त्रुटी दुरुस्त करण्याची आणि लाभ अखंडितपणे मिळविण्याची संधी मिळत आहे.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत आज मंत्री महोदया यांनी या प्रक्रियेला अधिक सुसूत्रता आणण्याबद्दल चर्चा केली. दरम्यान, लाभार्थी नोंदी, बँक तपशील, आणि आधार पडताळणी या बाबींमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासन तत्परतेने कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
उर्वरित लाभार्थी भगिनींनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ चालू ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंत्री महोदयांनी आपल्या अधिकृत X (ट्विटर) खात्यावरून म्हटले आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली.
दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून https://t.co/gBViSYZxcm या…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 28, 2025
e kyc लाडकी बहिन योजना महाराष्ट्र लिंक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची चरणवार माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. मुख्यपृष्ठावर ‘e-KYC’ या बॅनरवर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड प्रविष्ट करा. आधार ऑथेंटिकेशनसाठी संमती देऊन Send OTP वर क्लिक करा; तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाइलवर आलेला OTP प्रविष्ट करा आणि सबमिट करा. प्रक्रिया यशस्वी झाली की, पुढील टप्प्यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून पुन्हा OTP पद्धतीने प्रमाणीकरण करा. त्यानंतर जात प्रवर्ग निवडा, व आवश्यक ती माहिती भरून शेवटी सबमिट करा. या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर e-KYC यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल, जेणेकरून योजनेचा आर्थिक लाभ वेळेवर मिळू शकेल.