ICC Women’s T20 World Cup 2026 Schedule: महिला टी-20 विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर; 12 जूनला सलामीचा सामना, भारत-पाक भिडत 'या' दिवशी

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असून, यंदा प्रथमच 12 संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. 12 जून रोजी यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल, तर 14 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे.

ICC Women’s T20 World Cup 2026 Schedule: महिला टी-20 विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर; 12 जूनला सलामीचा सामना, भारत-पाक भिडत 'या' दिवशी
Indian women's cricket team makes history by winning the World Cup (Photo: ICC)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. स्पर्धेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा असून, यात एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. १२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत इंग्लंड आणि वेल्समधील सात प्रतिष्ठित मैदानांवर एकूण ३३ सामने खेळवले जातील. स्पर्धेचा सलामीचा सामना यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर रंगणार आहे.

पात्रता फेरीतून चार संघांचा प्रवेश

नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पात्रता फेरीतून बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स या चार संघांनी मुख्य स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. हे संघ आता गतविजेता न्यूझीलंड, सहा वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांना आव्हान देतील.

भारत आणि पाकिस्तान आमनेसामने

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी, १४ जून रोजी एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ 'ग्रुप १' मध्ये असून त्यांच्या गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे.

येथे पहा पूर्ण वेळापत्रक

 

 

स्पर्धेचे स्वरूप आणि गटवारी

१२ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे:

ग्रुप १: ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्स.

ग्रुप २: इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, आयर्लंड आणि स्कॉटलंड.

(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2026 04:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).