Nana Patekar Dies: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिव दर्शनासाठी शरद पवार गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही रुग्णालयात पोहोचले.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी गोव्यामध्ये निधन झाले. डोना पावला येथे राहत्या घरी पहाटे छातीत दुखू लागल्याने अस्वस्थ अवस्थेत असलेल्या नानांना मणिपाल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सध्या नानांंच्या पार्थिवाचे पोस्ट मार्टम गोवा मेडिकल कॉलेज मध्ये होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पाटेकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. नानांचे पवार कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध होते.
WATCH | Bambolim, Goa | NCP-SP chief Sharad Pawar arrives at Goa Medical College, where the mortal remains of veteran actor Nana Patekar have been brought for post-mortem. https://t.co/bZaeORA5zT
— TIMES NOW (@TimesNow) October 8, 2026
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2026 02:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

