
Angara Airlines Plane Missing: रशियातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंगारा एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान टेकऑफनंतर काही वेळातच रडारवरून गायब झाले आहे. या विमानात 5 मुलांसह एकूण 50 प्रवासी आणि कर्मचारी होते. ही घटना उघडकीस येताच संपूर्ण रशियामध्ये खळबळ उडाली आहे. विमानाने इर्कुत्स्क शहरातून याकुत्स्कच्या दिशेने उड्डाण केले होते. मात्र काही वेळातच एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC)शी विमानाचा संपर्क तुटला. अनेक वेळा प्रयत्न करूनही संपर्क प्रस्थापित करता आला नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रशियन आपत्कालीन मंत्रालयाने तत्काळ शोध आणि बचाव मोहिम सुरू केली आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने शोध कार्य चालू आहे. परंतु दुर्गम भूगोल आणि प्रतिकूल हवामानामुळे अडथळे येत आहेत. विमानाचा शेवटचा संपर्क चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराजवळ झाला होता. अमूरचे गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह यांच्या माहितीनुसार, विमानात 43 प्रवासी, ज्यात 5 लहान मुले आणि 6 क्रू मेंबर्स होते. (हेही वाचा - Bangladesh Air Force Jet Crash: बांग्लादेश मध्ये शाळेच्या इमारती वर कोसळलं F-7 Jet विमान)
दरम्यान, विमान अपघातग्रस्त झाले की सुरक्षित आपत्कालीन लँडिंग झाली. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापी, प्रवाशांच्या नातेवाईकांनी विमानतळावर गर्दी केली असून त्यांना सातत्याने अपडेट देण्यात येत आहे.