Mumbai | pixabay.com

'Compare the Market' ने केलेल्या अलिकडच्या जागतिक अभ्यासात मुंबईकर चालण्याच्या यादीमध्ये जगातील सर्वात खालच्या दहा शहरांमध्ये असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असूनही, शहराला पादचाऱ्यांच्या हालचाली आणि सुरक्षिततेला अडथळा आणणाऱ्या महत्त्वपूर्ण आव्हानांना तोंड द्यावे लागते.

HT च्या अहवालानुसार, मुंबई ही जगातील सर्वात किफायतशीर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, जिथे तिकिटांची किंमत फक्त २० रुपये आहे, जे Buenos Aires नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण परवडणारी सुविधा म्हणजे सुलभता नाही. शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये पुरेसे पादचाऱ्यांसाठी अनुकूल जागा नाही, ज्यामुळे पायी जाणाऱ्यांसाठी दररोज प्रवास करणे आव्हानात्मक बनत चालाले आहे.

चालण्यामध्ये अव्वल जगातील पाच शहरं कोणती?

सर्वात अव्वल स्थानी आहे. त्यांची 86% लोकसंख्या कार-मुक्त जागेच्या 1 किमीच्या आत राहते. त्यानंतर इटलीचं Milan, पोलंड चं Warsaw, फिनलंड मधील Helsinki, पाचव्या स्थानी फ्रान्स मधील पॅरिस शहराचा समावेश आहे. चालण्याच्या यादी मध्ये युरोपातील शहरं अव्वल आहेत. तर टोकियो हे टॉप 10 मध्ये असलेले एकमेव बिगर-युरोपियन शहर आहे.

जे लोक फिरण्यासाठी पायी, सायकलींवर किंवा सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी चालण्याची क्षमता ही केवळ जीवनशैलीची निवड नाही ती एक गरज आहे. मुंबईत सरासरी मासिक पाऊस हा जागतिक स्तरावर सर्वाधिक असतो, विशेषतः पावसाळ्यात मुंबईकरांचं चालणं कमी होतं. वारंवार पाणी साचणे आणि निसरडे फुटपाथ पादचाऱ्यांना अडथळा आणतात, ज्यामुळे शहराच्या चालण्याच्या क्षमतेत आणखी घट होते.