
गणेशोत्सवाची धूम आता काही दिवसांत सुरू होणार आहे आणि याच उत्सवासाठी एक खास भक्तिगीत प्रदर्शित झालं आहे. Let's Get LOUDER या म्युझिक लेबलने त्यांचा पहिलाच भक्तीगीत ट्रॅक “वक्रतुंड – द अल्टिमेट गणपती अँथम” रिलीज केला आहे. हे गाणं गायक मो. साद नदीम यांनी सादर केलं आहे, तर संगीतकार आहेत अनुज गुप्ता. गाण्याचा व्हिडिओ सुप्रसिद्ध अभिनेते गौतम रोडे यांच्यावर चित्रित केला असून दिग्दर्शन अस्लम खान यांनी केलं आहे.
गणेश स्तोत्र आणि आधुनिक बीट्सचा संगम असलेलं हे गीत श्रद्धा आणि तरुणाईची उर्जा यांचा सुंदर मिलाफ घडवतं. “वक्रतुंड” हे गाणं सध्या सर्व प्रमुख म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसेच Let's Get LOUDER च्या यूट्यूब चॅनलवर खास पाहता येईल.
हे भन्नाट गाणे इथे पहा
Let's Get LOUDER हे 2023 मध्ये सुरू झालेलं म्युझिक प्लॅटफॉर्म असून ते कलाकारांना प्रोत्साहन देणं, नवीन संधी देणं आणि जागतिक स्तरावर पोहोचवणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे IN10 मीडिया नेटवर्कचा एक भाग आहे.
IN10 मीडिया नेटवर्कच्या छत्राखाली EPIC, ShowBox, Filamchi Bhojpuri, Gubbare, Ishara, Nazara, EPIC ON, DocuBay, MovieVerse Studios आणि Juggernaut Productions सारखे लोकप्रिय ब्रँड्स कार्यरत आहेत.