Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
Wedding | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भागलपूर (Bhagalpur) येथील सुलतानगंज (Sultanganj) येथून एक भलताच प्रकार पुढे आला आहे. या ठिकाणी एक तरुण चक्क आपल्या स्व:ताच्या लग्नाला जाणेच विसरला. प्राप्त माहितीनुसार नवरदेव (Bridegroom) असलेला हा तरुण व्यसणी होता. त्याला दारु सेवन करण्याचे प्रचंड व्यसन आहे. लग्नापूर्वी त्याने मद्य प्राशन केले. परिणामी तो नशेत तर्रर्र असल्याने लग्नालाच उपस्थित राहू शकला नाही.

नवरदेवाचा कारनामा समजताच वधू (Bridegroom) पक्षाकडील लोक प्रचंड चिडले. त्यांनी तरुण आणि तरुणाच्या नातेवाईकांसह त्यांचा मित्रपरिवार या सर्वांनाच पकडून ठेवले. या सर्वांनी विवाहासाठी आतापर्यंत झालेला खर्च परत करावा आणि हे लग्न मोडावे, अशी मागणी केली. हे प्रकरण पोलिसांतही पोहोचले. (हेही वाचा, Heart Blockage Pune: नवऱ्याच्या टोमण्यांमुळे हृदयात ब्लॉकेज, महिलेच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल)

अधिक माहिती अशी की, विवाह ठरल्याप्रमाणे वधूला घेऊन वधू पक्षाचे लोग विवाहस्थळ असलेल्या वराच्या दाखल झाले. पण, नवरदेवाचाच पत्ता नव्हता. जसजसा वेळ पुढे जात राहीला तसतशी वधू पक्षाची बेचैनी वाढली. त्यांनी वर पक्षाकडे विचारणा केली असता नवरदेव नशेत तर्र असल्याचे पुढे आले. त्यामुळे नवरीही भलतीच चिडली आणि वधूपक्षाचे लोकही. लग्नाच्या मंडपात हा वाद बराच काळ सुरु राहिला.

दरम्यान, दरम्यान, मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी खर्च केलेल्या पैशाची मागणी सुरू केली. स्थानिक पातलीवरील काही प्रतिष्ठीत लोकांनी एक बैठक घेऊन वराच्या कुटुंबीयांनी वधूपक्षाला झालेला खर्च द्यावा असे सांगितले. हे लग्न मोडले मात्र झालेला खर्च देऊन तोडगा काढण्याचे ठरले.