नवरा माझा नवसाचा 2 अभिनेत्री Hemal Ingle चा ब्राइड टू बी पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, लवकरच अडकणार विवाहबंधनात

नवरा माझा नवसाचा 2 फेम हेमल इंगळे लवकरच लग्न करणार आहे. तिने काही दिवसांपुर्वीच साखरपुडा केला होता. आता अभिनेत्रीच्या ब्राइड टू बी पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव रोनक आहे.

नवरा माझा नवसाचा 2 अभिनेत्री Hemal Ingle चा ब्राइड टू बी पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, लवकरच अडकणार विवाहबंधनात
Photo Credit- Instagram

Hemal Ingale Bride To Be Party: नवरा माझा नवसाचा 2 (Navra Maza Navsacha 2) अभिनेत्री हेमलने स्वत: पोस्ट लिहून ब्राइड टू बी पार्टीचा व्हिडिओ शेअर केला आहे. पार्टीत तिच्या खास मैत्रिणींचा समावेश असल्याचे दिसत आहे. ब्लॅक स्लिवलेस ड्रेस, मोकळे केस, मिनिमल मेकअपमध्ये अभिनेत्री खूपच छान दिसत आहे. त्यासेबतच केक कट करून तिने पार्टीचा (Hemal Ingale Bride To Be Party) आनंद साजरा केला. (Navra Maza Navsacha 2 On OTT: चित्रपटगृह गाजवल्यानंतर ‘नवरा माझा नवसाचा 2’ ओटीटीवर घालणार धुमाकूळ; 'इथे' पाहता येणार सिनेमा)

कॅप्शनमध्ये तिने लिहलं, "मी ज्यांच्यावर प्रेम करते आणि जे माझ्यावर प्रेम करतात असे माझ्या आयुष्यातील सर्व प्रेमळ या खोलीत आहेत. सर्वात कमाल रात्र होती ही... हे सर्व हे सगळं जुळवून आणल्याबद्दल आभार. आताचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता आणि ही आठवण मी आयुष्यभर जपेन! पण आता तुम्हा सगळ्यांबरोबर केक कापतानाचा हा भन्नाट व्हिडिओ शेअर करायला मला खूप आवडेल. हा व्हिडिओ माझ्या मैत्रीचं सार मांडतो. I Love You मैत्रिणींनो". हेमल इंगळेने शेअर केलेल्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळाल्या आहेत. चाहत्यांचे तिला भरपूर प्रेम मिळालेले आहे.

ब्राइड टू बी पार्टीचा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Heymal Ingley (@hemalingle)

हेमल इंगळेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने 'आस'मधून कलाविश्वात पदार्पण केले. अभिनय बेर्डेसोबत 'अशी ही आशिकी' या चित्रपटात काम केले. नुकताच तिचा 'नवरा माझा नवसाचा 2' प्रदर्शित झाला चाहत्यांना चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).