CNG | Representative Image (Photo/Pexels/ANI)

भारतात बायोइथेनॉल (Bioethanol Blending) उत्पादनामध्ये लक्षणीय प्रगती होत असून, पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा ( Ethanol Petrol Mix) उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने देश वेगाने पुढे जात आहे. मात्र, बायो-कंप्रेस्ड नॅचरल गॅस ( Bio-CNG Adoption) च्या स्वीकारासाठी धोरणात्मक पातळीवर आणखी गती देण्याची गरज आहे, असे S&P Global च्या अलीकडील अहवालात नमूद करण्यात आले आहे. सरकारच्या धोरणात्मक पाठिंब्यामुळे आणि उद्योगाच्या सहभागामुळे बायोइथेनॉलच्या उत्पादन व वापरात मोठी वाढ झाली आहे. इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित करण्यात आलेले 20 टक्के मिश्रणाचे लक्ष्य आता जवळपास गाठले जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यासोबतच बायो-CNG या दुसऱ्या महत्त्वाच्या नवीकरणीय इंधनाच्या स्वीकारात अनेक अडथळे असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः वाहतूक क्षेत्रात या इंधनाचा वापर वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी आणि स्वीकार यामध्ये सुधारणा आवश्यक आहे.

ऊर्जा संक्रमणासाठी बायो-CNG चा समावेश आवश्यक

  • भारत ऊर्जा संक्रमणासाठी ‘मल्टी-फ्युएल मिक्स’ या धोरणावर भर देत आहे. या धोरणात केवळ इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड वाहनांचा नव्हे तर बायोइंधनांचाही समावेश आहे. यामध्ये इथेनॉलसह बायो-CNG हे महत्त्वाचे घटक मानले जातात.
  • भारत सध्या सुमारे 88 टक्के क्रूड ऑईल आणि जवळपास 50 टक्के नैसर्गिक वायू आयात करतो. त्यामुळे देशांतर्गत बायोइंधनांच्या वापरामुळे केवळ पर्यावरणपूरक विकासच होणार नाही, तर ऊर्जा सुरक्षाही बळकट होणार आहे.

वाहतूक क्षेत्रात बायो-CNG चा मोठा उपयोग

धोरणात्मक पाठबळ आणि गुंतवणूक आवश्यक – S&P Global

S&P Global चा निष्कर्ष असा आहे की जसे बायोइथेनॉलमध्ये प्रगती झाली आहे, तसेच लक्ष आता बायो-CNG च्या दिशेनेही केंद्रित करणे आवश्यक आहे. अधिक धोरणात्मक पाठबळ, गुंतवणूक आणि खाजगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग यामुळेच बायो-CNG च्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करता येईल आणि भारताच्या ऊर्जा तसेच वाहतूक धोरणात हा इंधनप्रकार महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.