Photo Credit- X

कडून MAH MBA CET 2025 परीक्षेसाठी Final Answer Key जारी केली आहे. यंदा MAH MBA CET 2025 ची परीक्षा 1,2,3 एप्रिल दिवशी झाली होती. या परीक्षेच्या माध्यमातून एमबीए आणि एमएमएस साठी अ‍ॅडमिशन केली जातात. 28 एप्रिल रोजी provisional answer key प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवारांना 30 एप्रिलपर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. सीईटी सेलला 101 unique questions वर एकूण 253 आक्षेप मिळाले आहे. रिव्ह्यूनंतर, सेलने 6 उत्तरे अपडेट करण्यात आली आहेत आणि 28 प्रश्नांसाठी ग्रेस मार्क दिले आहेत.

अंतिम उत्तरपत्रिका आता अधिकृत वेबसाइट - cetcell.mahacet.org वर उपलब्ध आहे. अंतिम उत्तरपत्रिका जारी झाल्यानंतर, आता लवकरच निकाल जारी होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षासाठी जागा वाटप निश्चित करणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. नक्की वाचा: MHT CET 2025 PCM, PCB Answer Key Out: एमएचटी सीईटी च्या पीसीएम, पीसीबी ग्रुप ची आन्सर की जारी; आता cetcell.mahacet.org वर निकालाची प्रतिक्षा .

MAH MBA CET Final Answer Key कशी कराल डाऊनलोड?

  • cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • “Candidate Registration A.Y 2025-26” वर क्लिक करा.
  • तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • “Objection Tracking” tab वर क्लिक करा.
  • final answer key आता स्क्रिंन वर दिसेल. पीडीएफ स्वरूपात ती डाऊनलोड करता येते.

final answer key मध्ये विभागवार प्रश्न, अधिकृत उत्तरे आणि तुमचे प्रतिसाद समाविष्ट आहेत. ते तुमच्या गुणांचा अंदाज घेण्यास आणि आक्षेप प्रक्रियेनंतर केलेल्या कोणत्याही सुधारणा समजून घेण्यास मदत करते.