Result | Pixabay.com

Maharashtra State Common Entrance Test Cell कडून एमएचटी सीईटीच्या पीसीएम आणि पीसीबी ग्रुपची Provisional Answer Key प्रसिद्ध केली आहे. cetcell.mahacet.org वर रोल नंबर आणि जन्म तारीख टाकून डॉक्युमेंट्स डाऊनलोड करता येणार आहेत. MHT CET 2025 PCB, PCM Answer key, response sheet The answer key आणि अन्य डॉक्युमेंट्स MHT CET portal वर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना आता प्रोव्हिजनल आन्सर की आणि त्यांचा रिस्पॉन्स त्याच्यासोबत पडताळून पाहता येणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वरच निकालाची देखील माहिती दिली जाईल अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. MHT CET 2025 Result Declared for Select Exams: महाराष्ट्र सीईटी सेल कडून MAH-Nursing , MH-BHMCT/MHMCT (Integrated)-CET सह काही निवडक परीक्षांचे निकाल केले जाहीर; पहा स्कोअरकार्ड cetcell.mahacet.org वर.   

सीईटी सेल ची Answer key जारी झाल्यानंतर official objection window देखील उघडण्यात आली आहे. 18 मे 2025 च्या अधिकृत सूचनेनुसार, उमेदवार 19 मे ते 21 मे पर्यंत हरकती नोंदवू शकतात. candidate portal द्वारे ऑनलाइन सादर कराव्या लागतील. प्रत्येक प्रश्नासाठी शुल्क 1 हजार रुपये आहे, जे रिफंड होणार नाही. ऑफलाइन सबमिशन स्वीकारले जाणार नाहीत.

MHT CET 2025 answer key वर हरकती कशा सादर करणार?

  • cetcell.mahacet.org वर लॉगिन करा.
  • ज्या प्रश्नावर हरकत आहे तो निवडा. त्याचं स्पष्टीकरण लिहा.
  • प्रतिप्रश्न 1 हजार रूपये भरा.
  • आता तुमची हरकत “Objection Tracking” वर त्याचे स्टेटस तपासू शकता.

MHT CET 2025 निकालाची प्रतिक्षा

MHT CET 2025 च्या पीसीएम आणि पीसीबी ग्रुप च्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे. मे महिन्याच्या शेवटापर्यंत ही आन्सर की ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यामध्ये निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.