निकाल । File Image

 

महाराष्ट्र राज्य सीईटी सेल (State Common Entrance Test (CET) Cell of Maharashtra) कडून काही सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अधिकृत नोटिफिकेशन नुसार, MAH-Nursing CET-2025, MH-BHMCT/MHMCT (Integrated)-CET 2025, MAH-MCA CET-2025, MH-DPN/PHN CET, MAH-M.P.Ed CET-2025, आणि MAH-B.P.Ed CET-2025 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. MHT CET ची अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येणार आहेत. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा रजिस्टर इमेल आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.

MHT CET Result 2025 कसा पहाल ऑनलाईन?

  • अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
  • होमपेज वर असलेल्या रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
  • इमेल आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • आता स्क्रिनवर तुमचं स्कोअरकार्ड दिसेल.
  • तुमचं स्कोअरकार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता.

दरम्यान, सीईटी सेल कडून प्रश्नपत्रिका, उमेदवारांचे प्रतिसाद, योग्य उत्तरपत्रिका आणि प्रश्नांबाबत उमेदवारांच्या तक्रारी/आक्षेप सादर करण्याचे वेळापत्रक देखील जारी केले आहे. परिपत्रकानुसार, एमएएच-बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीईटी-२०२५ साठी उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका १६ मे रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

उमेदवाराला परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असेल, तर तो वरील वेळापत्रकानुसार उमेदवाराच्या लॉगिनद्वारेच सादर करावा लागेल. उमेदवाराला प्रति प्रश्न/प्रति आक्षेप 1000 रुपये (नॉन रिफंडेबल) फक्त उमेदवार लॉगिनद्वारे ऑनलाइन भरावे लागतील. नक्की वाचा: Low Marks in HSC: इयत्ता 12 वी परीक्षेत मित्रांपेक्षा कमी गुण मिळालेत? परिस्थिती सकारात्मकपणे कशी हाताळाल? घ्या जाणून .

PCM/ PCB Final Answer Key ची प्रतिक्षा

12वीनंतर अभियांत्रिकी,फार्मा साठी पदवीचं शिक्षण घेणार्‍यांसाठी सीईटी सेल कडून घेण्यात आलेल्या PCM/ PCB ग्रुपच्या परीक्षेसाठी आता Final Answer Key ची प्रतिक्षा आहे. विद्यार्थ्यांना लवकरच यंदाच्या सीईटी परीक्षेतील त्यांच्या ग्रुपची अंतिम आन्सर की मिळनार आहे त्यानंतर काही दिवसात निकाल जाहीर होतील. आन्सर की जारी झाल्यानंतर ती cetcell.mahacet.org. वरून डाऊनलोड करता येणार आहे.