MHT CET 2024 Revised Exam Dates: एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग सह अन्य कोर्सच्या सीईटी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

नव्या वेळापत्रकानुसार, MHT CET 2024 PCB ग्रुपची परीक्षा 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर MHT CET PCM ग्रुपची परीक्षा 2 मे ते 16 मे दरम्यान होणार आहे.

MHT CET 2024 Revised Exam Dates: एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग सह अन्य कोर्सच्या सीईटी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल
Exam | File Image

देशात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान चालणार्‍या 7 टप्प्यातील लोकसभा निवडणूकांच्या मतदानामुळे अनेक परीक्षांचे या दोन महिन्यातील वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता राज्यात होणार्‍या सीईटी परीक्षेतही बदल केल्याचे State Common Entrance Test Cell, Maharashtra कडून सांगण्यात आले आहे. एलएलबी, इंजिनियरिंग, नर्सिंग आणि अन्य कोर्ससाठी होणार्‍या MHT CET 2024 च्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

नव्या वेळापत्रकानुसार, MHT CET 2024 PCB ग्रुपची परीक्षा 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर MHT CET PCM ग्रुपची परीक्षा 2 मे ते 16 मे दरम्यान होणार आहे. यापूर्वी या परीक्षा 16-30 एप्रिल दरम्यान आयोजित केल्या गेल्या होत्या. MAH- AAC CET ची परीक्षा 12 मे दिवशी, MAH- L.L.B.5 Yrs. CET( Five Year Integrated Course) ची परीक्षा 17 मे दिवशी, MH- Nursing CET ची परीक्षा 18 मे दिवशी MAH- B.BCA/BBA/BMS/BBM-CET ची परीक्षा 27 ते 29 मे दिवशी होणार आहे. नक्की वाचा: NEET PG 2024 Revised Exam Date: नीट पीजी 2024 च्या परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर .

पहा सुधारित वेळापत्रक 

सीईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या 10 दिवस आधी अ‍ॅडमीट कार्ड्स दिली जातील. सीईटी परीक्षेतील लॉगिन क्रेडेंशिअल्स ही रजिस्ट्रेशन नंबर आणि बर्थ डेट आहे. या माहितीच्या आधारे ऑनलाईन अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करता येतील. अ‍ॅडमीट कार्ड वर काही चूक असेल तर त्यामध्ये बदल करून घेण्यासाठी संबंधित विभागाकडे/हेल्पलाईन नंबर वर मदत मागण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2024 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).