Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

Opportunities After Class 10th 12th:  दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर काय करावे हा प्रश्न उपस्थित राहतो. नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, आता विद्यार्थ्यांसमोर कोणते क्षेत्र निवडावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी याबद्दलचा विचार केला असेल परंतु अनेक विद्यार्थी अद्यापही संभ्रमात आहे. तुमचे काम थोडे हलके करण्यासाठी आम्ही काही पर्याय घेऊन आलो आहोत. विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात. तुम्ही कोणता कोर्स निवडता यावर हे तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असते. सध्या विद्यार्थ्यांना अनेक संधी प्रत्येक क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. आम्ही काही निवडक क्षेत्रामाहिती घेऊन आलो आहोत, पाहा

11 वी नंतर काय करावे:

बॅचलर ऑफ सायन्स किंवा B.Sc हा इयत्ता 11 आणि इयत्ता 12 व्या वर्गात विज्ञानाचा अभ्यास करणार्‍या लोकांसाठी मानक अंडरग्रेजुएट पदवी पर्याय आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि गणित हे तीन वर्षांच्या B.Sc अभ्यासाचा भाग असतील. विद्यार्थी या विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळवू शकतात आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित इत्यादी विषयात विज्ञानात पदवी मिळवू शकतात. तसेच इंजिनियरिंग हा देखील चांगला पर्याय आहे. दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा करू शकतात. 

12 वी नंतरचे पर्याय:

जेव्हा एखादा विद्यार्थी 12वी पूर्ण करतो तेव्हा त्याचे आयुष्यात एक मोठे वळण घेण्यास तयार होते आणि त्यांना 12वी सायन्स नंतर करिअरचे पर्याय काय आहेत याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे, बारावीनंतर तुम्ही शिकू शकणार्‍या प्रत्येक अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सामान्यतः, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याचा हा टर्निंग पॉइंट असतो कारण तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल निर्णय घ्यायचा असतो जो एक अतिशय गंभीर आणि महत्वाचा निर्णय आहे आणि म्हणून निर्णय काळजीपूर्वक घेतले पाहिजे विज्ञान हा एक अपेक्षित अभ्यासक्रम मानला जातो कारण ते त्यांच्यासाठी अनेक दरवाजे उघडते, प्रामुख्याने वैद्यकीय आणि अभियांत्रिकी, दरम्यान आता अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा ही विचार करावा.