
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून (Mumbai) एक सकारात्मक आणि आशादायक बातमी समोर आली आहे. मशिदींमधील (Mosques) लाऊडस्पीकरवरून (Loudspeaker) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शांततेत सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबईतील मशिदींनी लाऊडस्पीकरवरील निर्बंधांना तोंड देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत, एक नाविन्यपूर्ण उपाय शोधला आहे. माहिम जुमा मशिदीने एक समर्पित मोबाइल अॅप सादर केला केले आहे, जो अझान थेट प्रक्षेपित करतो. माहीम जुमा मस्जिद ट्रस्टच्या मते, मुंबईतील अनेक शहरी भागात अजानसाठी लाऊडस्पीकरच्या वापरावरील निर्बंधांमुळे, जुमा मस्जिदने एक समर्पित मोबाइल अॅप लाँच केले, जे तामिळनाडूमधील एका टीमच्या नेतृत्वाखालील व्यावसायिकांच्या टीमच्या तांत्रिक मदतीने विकसित केले गेले.
या अॅपचे नाव ऑनलाइन अझान अॅप आहे. हे अॅप नमाजच्या वेळी अजानचे थेट प्रसारण लोकांच्या मोबाइल फोनवर करते. हे अॅप अँड्रॉइड आणि आयफोनवर उपलब्ध आहे. या अॅपमुळे लाऊडस्पीकरच्या वापरावरील निर्बंध असतानाही लोकांना त्यांच्या स्थानिक मशिदीतील अजान ऐकता येते. अहवालानुसार, मुंबईतील 6 मशिदींनी या अॅपच्या सर्व्हरवर नोंदणी केली आहे, आणि 500 हून अधिक स्थानिक रहिवाशांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. अजानच्या वेळेपूर्वी, वापरकर्त्यांना नमाज सुरू होण्याच्या सूचना मिळतात.
मुंबईत लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत, विशेषतः ध्वनिप्रदूषण (नियंत्रण आणि नियमन) नियम, 2000 अंतर्गत, ज्यामुळे रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकरचा वापर प्रतिबंधित आहे. याशिवाय, बॉम्बे उच्च न्यायालयाने दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल ध्वनी मर्यादा निश्चित केली आहे. या नियमांचे पालन करण्यासाठी आणि पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याऐवजी, मुंबईतील काही मशिदींनी तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. हे अॅप विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि मशिदीच्या जवळ राहणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे, ज्यांना पारंपरिक लाऊडस्पीकरच्या अनुपस्थितीत अजान ऐकणे कठीण झाले आहे.
‘ऑनलाइन अजान’ अॅप तमिळनाडूतील तिरुनेलवेली येथील आयटी तज्ज्ञांच्या टीमने विकसित केले आहे. वापरकर्त्यांना अॅप डाउनलोड करून त्यांच्या स्थानिक मशिदीची निवड करावी लागते, आणि त्यानंतर अजानच्या वेळी त्यांना थेट ऑडिओ प्रसारण आणि सूचना मिळतात. हे अॅप स्मार्टवॉचसारखे कार्य करते, जे स्वयंचलितपणे अजानच्या वेळी सक्रिय होते. यामुळे भक्तांना मशिदीत प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही नमाजच्या वेळेची माहिती मिळते. या अॅपच्या सर्व्हरचे स्थान भारतात आहे, आणि मशिदींना नोंदणीसाठी मशिदीचा पत्ता आणि अजान देणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डाची माहिती द्यावी लागते. (हेही वाचा: Starlink Approved In India: स्टारलिंकला सरकारकडून हिरवा कंदील! आता देशभरात डोंगराळ आणि दुर्गम भागांना मिळणार थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट)
गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात मशिदींमधील लाऊडस्पीकरवरून वाद सुरू आहे. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याविरुद्ध मोहीम सुरू केली होती आणि काही भागात पोलिसांकडे तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे, मुस्लिम समुदायाने हा त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला मानला. परंतु मुंबईच्या ऐतिहासिक माहिम मशिदीने या वादावर हे मोबाइल अॅप हा एक अनोखा आणि तांत्रिक उपाय शोधला. ‘ऑनलाइन अजान’ अॅप विकसित करणारी कंपनी तमिळनाडूत तीन वर्षांपासून कार्यरत आहे आणि त्यांनी तमिळनाडूतील 250 मशिदींना या अॅपशी जोडले आहे.