Starlink Approved In India: स्टारलिंकला सरकारकडून हिरवा कंदील! आता देशभरात डोंगराळ आणि दुर्गम भागांना मिळणार थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट

स्टारलिंकला अखेर भारतातील सेवांसाठी दूरसंचार परवाना मिळाला आहे. हा परवाना बराच काळ प्रलंबित होता.

Starlink Approved In India: स्टारलिंकला सरकारकडून हिरवा कंदील! आता देशभरात डोंगराळ आणि दुर्गम भागांना मिळणार थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट
Starlink internet (Photo Credit - Wikipedia)

Govt Gives Green Light To Starlink: एलोन मस्क (Elon Musk) यांच्या स्टारलिंक (Starlink) ला भारताच्या दूरसंचार मंत्रालयाकडून सॅटकॉम सेवा परवाना मिळाला आहे. युटेलसॅट-वनवेब आणि रिलायन्स जिओ-एसईएस नंतर भारतात ही मान्यता मिळवणारी ही तिसरी कंपनी आहे. यामुळे स्टारलिंकला व्यावसायिक सेवा सुरू करण्याचा मार्ग मिळाला आहे, विशेषतः ज्या भागात पारंपारिक नेटवर्क पोहोचत नाहीत अशा भागात सॅटेलाईट इंटनेट (Starlink Satellite Internet) सेवा फायदेशीर ठरणार आहे. अलीकडेच, स्टारलिंकने स्पेक्ट्रमचे वाटप प्रशासकीय पद्धतीने करावे आणि लिलावात विकले जाऊ नये असा आग्रह धरला होता. याला भारत सरकारनेही पाठिंबा दिला होता, ज्यावर रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांनीही आक्षेप घेतला होता.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्टारलिंकला अखेर भारतातील सेवांसाठी दूरसंचार परवाना मिळाला आहे. हा परवाना बराच काळ प्रलंबित होता. स्टारलिंकने 2022 मध्ये भारतात व्यावसायिक प्रवेशासाठी करार सुरू केला होता, परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव त्याला बराच काळ वाट पहावी लागली. आता दूरसंचार विभागाने (DoT) त्याला ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाईट (GMPCS) परवाना दिला आहे. त्यानंतर आता पुढील 15 ते 20 दिवसात सॅटेलाइट इंटनेटची चाचणी घेण्यात येणार आहे. (हेही वाचा - Starlink India Launch: भारतात Elon Musk यांच्या स्टारलिंक इंटरनेट सेवेची तयारी, ग्रामीण भागात मिळणार जोडणीचा फायदा)

स्टारलिंक आता दूरसंचार विभागाकडून सॅटकॉम परवाना मिळवणारी भारतातील तिसरी कंपनी बनली आहे. यापूर्वी युटेलसॅट-वनवेब आणि जिओ-एसईएस यांना परवाना देण्यात आला होता. या निर्णयामुळे भारतीय सॅटेलाईट इंटरनेट बाजारपेठेत तीव्र स्पर्धा निर्माण होणार आहे.

ग्रामीण भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत -

दरम्यान, स्टारलिंकचे लक्ष विशेषतः दुर्गम आणि कमी सेवा असलेल्या क्षेत्रांवर आहे, जिथे पारंपारिक नेटवर्क पोहोचू शकत नाहीत. लो-अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रह जलद आणि कमी-विलंब इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करतील. ज्यामुळे ग्रामीण भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 07:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).