बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असलेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट आता मराठीतही प्रदर्शित होणार आहे.
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला 'मोक्षदा' तसेच 'मोक्षदायिनी एकादशी' साजरी केली जाते. मोक्षदा एकादशीला पितरांना मोक्ष देणारी एकादशी, असे म्हटले जाते. जो व्यक्ती हे व्रत करील त्याच्या पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडले जातील. यावर्षी 8 डिसेंबरला 'मोक्षदा एकादशी' साजरी केली जाणार आहे. यादिवशी उपवास केल्याने पुण्य प्राप्ती होते.
महिलाच्या सुरक्षिततेसाठी नागपूर, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि मुझफ्फरनगर पोलिसांनी भयानक शांतता पसरलेल्या रस्त्यावर अडकेलेल्या महिलांना घरापर्यंत पोहचवण्यास मदतकार्य सुरू केले आहे. निर्मुष्य ठिकाणी अडकलेल्या महिलांना पोलिसांकडून 'होम ड्रॉप' सेवा पुरवण्यात येत आहे.
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर करणारे पोलिस सिंघम वी.सी. सज्जनार यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर वृत्त...
आता इन्स्टाग्रामवर नव्याने अकाऊंट सुरू करणाऱ्या युजर्सना त्याचे वय 13 वर्षे आहे, हे स्पष्ट करावे लागणार आहे. ज्या युजर्सचे वय 13 वर्षे असेल अशाच युजरला आता इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करता येणार आहे. त्यामुळे यापुढे तेरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला आपले इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करता येणार नाही. इन्स्टाग्रामने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.
हैदराबादमध्ये मागील आठवड्यात 27 वर्षीय महिला वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली होती. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. हा गुन्हा करणाऱ्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे.
आफ्रिका खंडातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ मौरिटेनिया या वायव्येकडील देशात बोटीचा भीषण अपघात झाला आहे. मौरिटेनियन किनाऱ्यावर बोट धडकून 58 स्थलांतरित ठार झाले आहेत.
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँक खातेधारकांमध्ये मोठी नाराजी होती. तसेच आरबीआयच्या या निर्णयामुळे पीएमसीच्या ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. मात्र, आता ठाकरे सरकार या खातेदारांसाठी दिलासादायक निर्णय घेणार आहे.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष ठरला आहे. हृतिकने आशियातील सर्वाधित लोकप्रिय सेक्सी पुरुषाचा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे केवळ 2019 या वर्षातील नव्हे तर या दशकातील सर्वाधिक सेक्सी पुरुष म्हणून हृतिकने हा बहुमान पटकावला आहे.
आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'अनुत्तीर्ण' शेरा न देता 'कौशल्य विकासास पात्र' असा शेरा देण्यात येणार आहे. सरकारने यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला आदेश दिले आहेत.
उन्नावमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये रोहिणी सेक्टर 16 भागामध्ये एका कारमध्ये 2 जणांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली.
नेटिझन्सनी कांद्याचे दर पाहून TikTok या अॅपवर मजेशीर व्हिडिओ तयार केले आहेत. तसेच सध्या सोशल मीडियावर #OnionCrisis असा ट्रेंड सुरू आहे.
अरबी समुद्रात 3 डिसेंबरपासून अडकलेल्या 264 मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली आहे.
आज पहाटे ठाणे, दादर, कुर्ला, सायन तसेच मुंबई शहरात रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. 'स्कायमेट' या खासगी वेधशाळेने बुधवारी मुंबई, पुणे, नाशिक भागात पावसाचा अंदाज वर्तवला होता. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'पवन' आणि 'अम्फन' या चक्रीवादळामुळे या भागात पाऊस कोसळला.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाअगोदरच आनंदाची बातमी मिळाली आहे. प्रियंकाला 'माराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'ने सन्मानित करण्यात आलं आहे.
अहेरीजवळील प्राणहिता नदीमध्ये आज सकाळीच्या सुमारास नाव उलटली. या नावेत 4 प्रवासी, 1 नावाडी आणि त्याचा सहायक असे 6 जण होते. ही नाव अहेरीवरून तेलंगणातील गुडेम येथे जाण्यासाठी निघाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्राणहिता नदीत काही अंतर पार केल्यानंतर लगेचचं ही नाव उलटली. यातील नाव चालक, सहाय्यक व इतर 2 जण पाण्याबाहेर आले. मात्र, आणखी 2 जण बेपत्ता आहेत.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना कुटुंबासोबत राहण्यासाठी एका वर्षात 100 दिवस मिळावेत. तसेच जवानांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले आहे.
बॉलिवूड अभिनेता मोहनीश बहल याची मुलगी प्रनूतन बहलचे साडीमधील बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत. प्रनूतनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने प्रेझेंटर म्हणून 'दुर्गावती' या चित्रपटाची घोषणा केली आहे.