Tesla Model Y India | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

टेस्ला कंपनीने अखेर भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक SUV – Model Y – लॉन्च केली आहे. कंपनीने या गाडीसाठी दोन व्हेरियंट्स सादर केले आहेत – Rear-Wheel Drive (RWD) आणि Long Range RWD. RWD व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ₹59.89 लाख आहे, तर Long Range व्हेरियंट ₹67.89 लाख (ex-showroom) आहे. ऑन-रोड किंमत RWD साठी ₹61.07 लाख आणि Long Range साठी ₹69.15 लाख इतकी आहे. यामध्ये ₹50,000 "Administration and Service Fee" देखील समाविष्ट आहे, ज्यामध्ये 18 टक्के GST आहे.

बांधणी आणि इतर बाबी

टेस्ला कंपनी ग्राहकांना अनेक कस्टमायझेशन पर्याय देत आहे, ज्यामुळे ऑन-रोड किंमत बदलू शकते. उदाहरणार्थ, Full Self Driving (FSD) फीचर घ्यायचा असल्यास ग्राहकांना ₹6 लाख अतिरिक्त खर्च करावा लागेल. (हेही वाचा, Tesla Showroom Mumbai Launch: टेस्लाचा भारतात प्रवेश, मुंबई येथील बीकेसीमध्ये पहिलं शोरूम आजपासून सुरू)

आंतरराष्ट्रीय किंमतींची तुलना

अमेरिकेत टेस्ला इलेक्ट्रीक व्हेईकल Model Y ची किंमत $44,990 (सुमारे ₹38.63 लाख), चीनमध्ये 263,500 युआन (सुमारे ₹31.57 लाख) आणि जर्मनीमध्ये 45,970 युरो (सुमारे ₹46.09 लाख) आहे. भारतात ही किंमत आयात शुल्क आणि लॉजिस्टिक खर्चामुळे अधिक आहे. (हेही वाचा, Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना)

परफॉर्मन्स आणि रेंज

भारतातील RWD व्हेरियंटमध्ये 60 kWh आणि 75 kWh बॅटरी पर्याय उपलब्ध असतील. सिंगल इलेक्ट्रिक मोटर 295 hp तयार करते. 60 kWh बॅटरीची WLTP रेंज एकाच चार्जमध्ये 500 किमी आहे, तर Long Range व्हेरियंटची रेंज 622 किमी आहे.

डिझाइन आणि फीचर्स

Tesla Model Y ही कार 7 बाह्य रंग आणि 2 इंटिरिअर ट्रिम पर्यायांसह सादर केली जात आहे. फीचर्समध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • 15.4-इंच फ्रंट इन्फोटेनमेंट डिस्प्ले
  • 8-इंच रिअर स्क्रीन
  • पॉवर-ऍडजस्टेबल फ्रंट सीट्स आणि स्टीअरिंग कॉलम
  • ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल
  • 19-इंच क्रॉसफ्लो व्हील्स
  • फिक्स्ड ग्लास रूफ
  • पॉवर रिअर लिफ्टगेट

भारतातील वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम EV मार्केटमध्ये टेस्ला Model Y एक आकर्षक पर्याय म्हणून उभा राहत असून, कंपनीचे हा एक मोठा पाऊल मानला जात आहे.

BKC, मुंबईत टेस्लाचे पहिले शोरुम

टेस्लाने भारतातील आपले पहिले अनुभव केंद्र मुंबईच्या बँद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे सुरू करण्याचे निश्चित केले आहे. हे केंद्र टेस्लाच्या भारतातील प्रवासाची सुरुवात ठरणार आहे. भारत चीन व अमेरिका यांच्या तुलनेत EV क्षेत्रात थोडा उशिराने उतरला असला, तरी मागणीतील वाढ, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सरकारी प्रोत्साहनामुळे टेस्लासारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा ओढा भारताकडे वाढतो आहे.

टेस्ला ही वाहने चीनमधील शांघाय Gigafactory मधून भारतात आयात करणार आहे. याच कारखान्यातून टेस्ला आपला आशिया आणि युरोपसाठीचा मुख्य उत्पादन पुरवठा करते. आतापर्यंत सहा Model Y SUV भारतात दाखल झाल्या आहेत, ज्या प्रदर्शन व चाचणीसाठी वापरण्यात येणार आहेत. आयात डेटानुसार, टेस्लाने भारतात अद्यापपर्यंत $1 दशलक्षहून अधिक किंमतीची वाहने, सुपरचार्जर उपकरणे व इतर अ‍ॅक्सेसरीज पाठविल्या आहेत. यामध्ये चीन व अमेरिकेतील टेस्ला केंद्रांमधून आलेल्या वस्तूंचा समावेश आहे.

दरम्यान, ही कार संपूर्णपणे आयात असल्यामुळे ती इतर देशांच्या तुलनेत भारतात अधिक महाग मिळणार आहे. तरीही, टेस्लाची ही लाँचिंग भारतातील जलदगतीने वाढणाऱ्या वाहन बाजारात महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.