
Maharashtra FYJC Admission 2025: महाराष्ट्राच्या राज्य शिक्षण मंडळाकडून अकारावी प्रवेशासाठी (FYJC Admissions) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज 19 मे पासून सुरू होत आहे. महाराष्ट्रात यंदा 9281 कॉलेज मध्ये प्रवेशासाठी ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. Centralised Online Admission Process द्वारा पहिली मेरीट लिस्ट 3 जून 2025 दिवशी जारी केली जाणार आहे. राज्यात 8 विभागीय मंडळांमध्ये एकूण 20.43 लाख विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेशप्रक्रिया आहे. आठ विभागीय मंडळांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि छत्रपती संभाजी नगर चा समावेश आहे. यामध्ये विज्ञान शाखेसाठी 8.52 लाख, कॉमर्स साठी 5.40 लाख आणि आर्ट्स साठी 6.50 लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये कोकण विभागाचा समावेश नाही.
कशी असेल अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया?
विद्यार्थ्यांना पोर्टलची ओळख करून देण्यासाठी 19 आणि 20 मे रोजी सराव सत्राने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम भरणे 21 मे रोजी सुरू होईल. 28 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही प्रक्रिया खुली राहणार आहे.
विद्यार्थी जास्तीत जास्त 10 ज्युनियर कॉलेजेस निवडू शकतात. मॅनेजमेंट कोटा किंवा मायनॉरिटी लागू कोट्याअंतर्गत अर्ज करू शकतात. 30 मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, 1 जून रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी आणि दुरुस्त्या करण्यासाठी एक विंडो खुली केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी 3 जून रोजी जाहीर केली जाईल. त्यानंतर 5 जून रोजी Zero Round of Seat Allocation होईल.
FYJC Admission 2025 ची कशी असेल प्रक्रिया?
- mahafyjcadmissions.in वर रजिस्टर करा.
- 21 मे दिवशी सकाळेऐ 11 वाजल्यापासून अधिकृतपणे ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल.
- रजिस्ट्रेशन करून आवश्यक माहिती भरा. तुमची डॉक्युमेंट्स अपलोड करा. तपशील तपासा.
ऑनलाईन पोर्टलवरच तुम्हांला मेरीट लिस्ट पाहता येईल, कॉलेज अलॉटमेंटची माहिती मिळेल.
ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये जागा मिळाल्या आहेत त्यांना 6-12 जून दरम्यान कागदपत्रे अपलोड करून आणि त्यांची पडताळणी करून त्यांच्या जागा निश्चित करता येतील. दुसऱ्या फेरीसाठी उर्वरित रिक्त जागांची यादी 14 जून रोजी प्रसिद्ध होईल.
विद्यार्थी आणि पालकांना www.mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर दिलेल्या वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.