
भारतीय लष्कराने 54th Technical Entry Scheme (TES-54) साठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कमिशन्ड ऑफिसर म्हणून काम करणार्यांसाठी ही नोकरीची संधी आहे. विज्ञानाची चांगली पार्श्वभूमी असलेल्या आणि देशाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या 10+2 पदवीधरांना लक्ष्य करून, TES-54 केवळ अभियांत्रिकीमध्ये पूर्णपणे sponsored degree प्रदान करत नाही तर सैन्यात कायमस्वरूपी कमिशनचे दरवाजे देखील उघडणार आहेत.
निवडलेल्या उमेदवारांना अभियांत्रिकी पदवी देण्यासाठी चार वर्षांच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल, त्यानंतर त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर कायमस्वरूपी कमिशन दिले जाईल.
प्रशिक्षणादरम्यान कॅडेट्सना मासिक 56,100 रुपये वेतन दिले जाईल. जे एनडीए कॅडेट्सच्या वेतनश्रेणीइतके असेल. त्यांना नियुक्ती मिळाल्यानंतर लेफ्टनंट पदाचे वेतन, भत्ते आणि फायदे मिळण्यास पात्र असतील, ज्यात वैद्यकीय सुविधा, प्रवास सवलती आणि इतर सेवा लाभांचा समावेश असेल.
TES-54 चे पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता: अर्जदार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात किमान 60% गुणांसह PCM मध्ये 10+2 उत्तीर्ण असावेत. तसेच त्यांनी JEE (Main) 2025 देखील दिलेली असावी.
वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 16½ - 19½ वर्ष दरम्यान असावे आणि त्यांचा जन्म 2 जुलै 2006 ते 1जुलै 2009 दरम्यान झाला पाहिजे.
केवळ अविवाहित पुरूष यासाठी अर्ज करू शकतात.
Indian Army 10+2 TES 54 Entry 2025 साठी अर्ज कसा कराल?
- अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in ला भेट द्या.
- 13 मे ते 12 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन नीट वाचा.
- आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा: शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्राचा पुरावा, पत्ता स्कॅन केलेला पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी अर्जातील डेटा अचूकपणे प्रविष्ट करा.
- प्रत्येक फील्डची पडताळणी करा आणि सबमिट करण्यापूर्वी पूर्णपणे तपासा.
- अर्ज शुल्क आकारले असल्यास ते भरा.
- फॉर्म अंतिम करा आणि सबमिट करा आणि संदर्भासाठी शेवटच्या सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या.
महत्त्वाच्या तारखा
Indian Army 10+2 Technical Entry Scheme (TES) 54 साठी ऑनलाइन अर्ज फॉर्म 13 मे 2025 पासून उपलब्ध आहे आणि 12 जून 2025 रोजी बंद होईल. अर्जदारांनी दिलेल्या कालावधीत फॉर्म भरण्याची खात्री करावी कारण त्यानंतर कोणताही अर्ज विचारात घेतला जाणार नाही. शेवटच्या क्षणी तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी फॉर्म वेळेच्या आधीच भरा.