UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक

भारतीय संरक्षण दलात लष्करात लेफ्टनंट, नौदलात सब-लेफ्टनंट पद किंवा हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून उमेदवारांची भरती करण्यासाठी एनडीए परीक्षा घेतली जाते.

UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
UPSC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

UPSC कडून आगामी 2026 वर्षाचं परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. Union Public Service Commission कडून UPSC Prelims 2026 परीक्षा 24 मे 2026 दिवशी घेतली जाणार आहे तर UPSC Mains 2026 ही परीक्षा 21 ऑगस्ट 2026 दिवशी घेतली जाणार आहे. कमिशन कडून National Defence Academy (NDA) 2026 exam आणि Combined Defence Services (CDS) exam या दोन्ही परीक्षा 12 एप्रिल 2026 दिवशी घेतल्या जाणार आहेत. यूपीएससी कडून NDA आणि CDS exam वर्षातून दोनदा घेतली जाणार आहे. पुढील वर्षी ही परीक्षा दुसर्‍यांदा 13 सप्टेंबर 2026 ला होणार आहे.

यूपीएससी सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेस (सीएपीएफ) परीक्षा 19 जुलै 2026 रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, यूपीएससी प्रिलिमिनी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2026 आहे. नक्की वाचा:  UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अ‍ॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड. 

यूपीएससी कडून 2026 च्या परीक्षांच्या तारखा जाहीर

परिस्थितीनुसार, परीक्षांच्या अधिसूचनेच्या तारखा, सुरुवात आणि कालावधी बदलू शकतो असे यूपीएससीने म्हटले आहे. विशेष म्हणजे, आयोग सामान्यतः त्यांचे कॅलेंडर पूर्णपणे पाळतो आणि इतर परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थांना त्यानुसार त्यांचे परीक्षा वेळापत्रक निश्चित करता येते. या परीक्षांव्यतिरिक्त, आयोग विविध विभागीय परीक्षा आयोजित करतो. 2026 च्या कॅलेंडरमध्ये नमूद केलेल्या यूपीएससी परीक्षेच्या तारखांमध्ये काही बदल झाल्यास, सुधारित यूपीएससी परीक्षा कॅलेंडर जारी केले जाईल.

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2025 07:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).