UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी असते. अंतिम गुणवत्ता यादी सर्व टप्प्यांमधील एकत्रित गुणांच्या आधारे तयार केली जाते.
The Union Public Service Commission कडून अधिकृतपणे Civil Services Examination (CSE) Prelims 2025 ची अॅडमीट कार्ड्स जारी करण्यात आली आहे. रजिस्टर केलेल्या उमेदवारांना आता अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वरून त्यांची अॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारखेच्या मदतीने लॉगिन करावं लागणार आहे.
UPSC CSE Prelims 2025 परीक्षा यंदा 25 मे 2025 दिवशी होणार आहे. यावर्षी कमिशन कडून 979 पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. याच्या माध्यमातून IAS, IPS,IFS, Group A आणि Group B services ची पदं भरली जाणार आहेत. याव्यतिरिक्त, CSE सोबत संयुक्तपणे घेण्यात येणाऱ्या भारतीय वन सेवा परीक्षा 2025 द्वारे 150 पदे भरली जातील.
UPSC CSE Admit Card 2025 कसे कराल डाऊनलोड
- upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- “CSE Prelims 2025 Admit Card” या लिंकवर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारीख टाका व लॉगइन करा.
- आता तुमचं अॅडमीट कार्ड पहा आणि डाऊनलोड करा.
- अॅडमीट कार्ड ची प्रिंट आऊट देखील काढू शकता.
प्रवेशपत्रात दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचा. प्रवेशपत्राच्या छापील प्रतीसह वैध फोटो ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2025 11:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

