मार्गशीर्ष गुरूवार व्रत । File Image

Margashirsha Guruvar 2025 Start Date and End Date: महाराष्ट्रातील 2025 च्या मराठी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 21 नोव्हेंबर 2025 पासून होणार आहे आणि 19 डिसेंबर 2025 पर्यंत हा महिना चालू राहणार आहे. या महिन्यातील गुरुवारांची संख्या आणि त्याचे महत्त्व मराठी संस्कृतीत मोठे आहे. मराठी पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी "लक्ष्मी पूजा" करण्यात येते. या दिवशी महिलांनी व्रत ठेवून, लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते. या पौर्णिमेपासून पौर्णिमा पर्यंतचा कालखंड अत्यंत शुभ मानला जातो. घराघरात लक्ष्मीचे पावले काढणे, रांगोळी घालणे, आणि विशेष म्हणजे गोड पदार्थ केले जातात.

2025 मार्गशीर्ष गुरुवार च्या तारखा

क्रमांक दिनांक विशेष पर्व
1 २७ नोव्हेंबर पहिला गुरुवार
2 ४ डिसेंबर दूसरा गुरुवार
3 ११ डिसेंबर तिसरा गुरुवार
4 १८ डिसेंबर चौथा गुरुवार

मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महिलांनी उपवास ठेवून देवी लक्ष्मीची पूजा करणे हे शुभ मानले जाते.नवविवाहित महिलांसाठी हा महिना आणि गुरुवार खूप महत्त्वाचा मानला जातो.