Joe Biden diagnosed with an aggressive form of prostate cancer | X and Pixabay.com

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष 82 वर्षीय जो बायडन (Joe Biden) यांना Aggressive Form of Prostate Cancer चं निदान झालं आहे. हा कॅन्सर त्यांच्या शरीरात हाडांपर्यंत पोहचल्याचं जारी निवेदनामध्ये सांगण्यात आले आहे. जो बायडन यांना मूत्र विसर्जनामध्ये त्रास होऊ लागल्याने रेग्युलर चेकअप नंतर प्रोस्टेट मध्ये गाठ असल्याचं समोर आलं. नंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर असल्याचं समोर आले. हा कॅन्सर आक्रमक स्वरूपाचा आणि Gleason score 9 चा असल्याचं समोर आलं आहे. Gleason score of 9 हा कॅन्सरच्या आक्रमकतेमध्ये सर्वाधिक रेंजमध्ये आहे.

GLEASON SCORE काय असतो?

Gleason score ही एक सिस्टिम आहे जी डॉक्टर सूक्ष्मदर्शकाखाली कर्करोगाच्या पेशी किती असामान्य दिसतात यावर आधारित प्रोस्टेट कर्करोगाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरतात.हा स्कोअर 6-10 मध्ये असतो. बायडेन यांच्या कॅन्सर मध्ये हा स्कोअर 9 आहे. म्हणजे कर्करोग उच्च दर्जाचा आहे आणि तो वेगाने वाढण्याची आणि पसरण्याची शक्यता आहे. हा स्कोअर पाहून डॉक्टर त्यांच्या कॅन्सरची ट्रीटमेंट कशी करणार? कोणती पद्धती वापरणार याची आखणी करतात.

Gleason score of 9 सामान्यतः 4+5 किंवा 5+4 असे दोन पॅटर्न एकत्र करतो, जिथे पहिला अंक सर्वात सामान्य पेशी नमुना दर्शवतो आणि दुसरा सेकंडरी पॅटर्न दाखवतो. पॅटर्न 5 सर्वात असामान्य, कमीत कमी differentiated cells दर्शवतो, जो जलद कर्करोग वाढ असल्याचे संकेत देतो.

American Cancer Society च्या माहितीनुसार, Gleason score of 9 हा Grade Group 5 शी संबंधित आहे, जो सर्वात जास्त रिस्क कॅटेगरी दाखवतो. जो कर्करोगाची वाढ आणि प्रसार होण्याची शक्यता दर्शवतो.

Metastasis to Bone म्हणजे काय?

निदानामध्ये bone metastasis चा समावेश आहे, म्हणजेच कर्करोग प्रोस्टेटच्या पलीकडे skeletal system पर्यंत पसरला आहे, जो advanced-stage (Stage IV) prostate cancer आहे.Mayo Clinic च्या मते, यामुळे उपचार गुंतागुंतीचे होतात.

भारतातील पुरूषांमध्ये  Prostate Cancer हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. देशातील दर 1 लाख पुरुषांमागे हा दर 9 असल्याचा अंदाज आहे. Indian Council of Medical Research (ICMR) च्या एका अभ्यासानुसार 2020 मध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे अंदाजे 40 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत.