Actor Kishan Kumar Daughter Tisha Dies: T-Seriesचे सह-मालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा हीचं निधन, वयाच्या 21 वर्षी घेतला अखेरचा श्वास
टी- सीरिजचा सहमालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार ही निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिशाने वयाच्या २१ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
Actor Kishan Kumar Daughter Tisha Dies: टी- सीरिजचा सहमालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार ही निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिशाने वयाच्या २१ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेनंतर कुमार कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. या वृत्तानंतर चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा- फूड पॉइजनिंगमुळे अभिनेत्री Janhvi Kapoor ची प्रकृती खालावली, एक-दोन दिवस डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार)
मिळालेल्या माहितीनुसार, तिशाला कॅन्सर होता त्यामुळे मुंबईतील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. कर्करोगाच्या उपचारासाठी तिला मुंबईहून जर्मनीला नेण्यात आले. जर्मनीत उपचारादरम्यान तिचे निधन झाले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दीर्घकाळापासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. परंतु जर्मनीत तिचा मृत्यू झाला.
कृष्ण कुमार यांच्या बद्दल
कृष्ण कुमार हे ९०च्या दशकातील अभिनेते आणि निर्माते आहे. बेवफा सनम या चित्रपटात त्यांनी मुख्य भुमिका निभावली होती. कृष्णा हे गुलशन कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. T-Series या भारतातील सर्वात मोठ्या संगीत निर्मिती कंपनीच्या मालकीसाठी प्रसिद्ध आहे. अभिनेती तान्या सिंग सोबत कृष्ण कुमारने लग्न केले होते. त्या जोडप्याला तिशा कुमार नावाची मुलगी होती.
(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2024 12:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

