शिवजयंती तिथीनुसार 2026

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हिंदू पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया या तिथीला महाराजांचा जन्म झाला होता. त्या अनुषंगाने ६ मार्च २०२६ रोजी, शिवनेरी किल्ल्यापासून ते रायगडापर्यंत आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत शिवभक्तांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तारीख आणि तिथीचा समन्वय

महाराष्ट्र शासनाने 19 फेब्रुवारी ही तारीख अधिकृत शिवजयंती म्हणून निश्चित केली असली, तरी अनेक शिवप्रेमी आणि संघटना परंपरेनुसार तिथीलाच महत्त्व देतात. यंदा १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार शिवजयंती साजरी झाल्यानंतर, ६ मार्च रोजी तिथीनुसार सोहळा साजरा होणार आहे. इतिहासकारांच्या मते, शालिवाहन शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया ही महाराजांची नेमकी जन्मतिथी आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) आपल्या मित्र-परिवाराला आणि नातेवाईकांना पाठवण्यासाठी येथे काही निवडक आणि प्रभावी शुभेच्छा संदेश दिले आहेत. (Shiv Jayanti Quotes In Marathi)

"सह्याद्रीच्या कडेकपारीतून आजही एकच आवाज येतो... 'जय भवानी, जय शिवाजी!' तिथीनुसार शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना भगव्यामय शुभेच्छा."

शिवजयंती शुभेच्छा मराठी

"निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। तिथीनुसार शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!"

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

"अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला पुन्हा एकदा 'शिवबा' पाहिजे. शिवजयंती निमित्त मानाचा मुजरा."

shiv jayanti chya hardik shubhechha in marathi text

"शब्दांना धार येईल, विचारांना पूर येईल... जेव्हा मनात माझा 'राजा' शिवछत्रपती येईल! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा."

chhatrapati shivaji maharaj jayanti chya hardik shubhechha in marathi

"माणसं जोडण्याचं कसब आणि स्वराज्य रक्षण्याचं धाडस, ज्यांनी जगाला शिकवलं, त्या शिवरायांना मानाचा मुजरा."

shivaji maharaj quotes in marathi

"इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकच राजा... छत्रपती शिवाजी महाराज!"

shivaji maharaj quotes in marathi shivjayanti

चला तर मग, या शिवजयंतीला शिवरायांचा वारसा अभिमानाने पुढे नेण्याचा संकल्प करूया. तिथीनुसार शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा भगव्यामय शुभेच्छा! जय भवानी, जय शिवाजी.