Lalbaugcha Raja Visarjan 2026 Live Stream: बाप्पा निघाले, भक्त हळहळले… लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू

लालबागचा राजा आता भाविकांचा निरोप घेऊन विसर्जनाला मार्गस्थ झाला आहे. किमान 15-17 तासांच्या मिरवणूकीनंतर 26 सप्टेंबरच्या पहाटे गिरगाव चौपाटीवर गणरायाचे विसर्जन केले जाणार आहे.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 Live Stream: बाप्पा निघाले, भक्त हळहळले… लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू
Lalbaugcha Raja 2026 Visarjan

यंदा 12 दिवस भाविकांच्या सेवेत असलेले बाप्पा आज अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. लाखो भाविकांच्या साक्षीने मुंबईतील लालबागच्या राजाची  भव्य  मिरवणूक सुरू झाली आहे. मंडपातून बाहेर पडताना "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. डोळ्यात आसवं आणि मनात कृतज्ञतेची भावना घेऊन भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. हा भावनिक क्षण थेट पाहण्यासाठी अनेकजण लालबाग परिसरात जमले आहेत. पण हा विसर्जन सोहळा आणि मिरवणूकीचे थेट प्रक्षेपणही पाहता येणार आहे.

लालबागचा राजा 2026 विसर्जन थेट प्रक्षेपण

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2026 12:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).