5 सप्टेंबर ला भारता मध्ये शिक्षक दिन (Teachers' Day) साजरा केला जातो. या शिक्षक दिना निमित्त आपल्या आयुष्यात आलेल्या शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. मग या दिवसाचं औचित्य साधत सोशल मीडीया मध्ये WhatsApp Status, Sticker, Facebook Messages, Wishes, Quotes, Greetings शेअर करत या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा द्या. त्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही खस शुभेच्छापत्र डाऊनलोड करून शेअर करायला विसरू नका.
डॉ.सर्वपल्ली यांची देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावर 1962 साली पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता. यानिमित्ताने देशभरात शिक्षकांच्या सन्मानार्थ अनेक लहान-मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मानही केला जातो. Teachers Day Last Minute Gift Idea 2024: शिक्षक दिनानिमित्त 10 मिनिटात बनवता येतील असे हटके DIY भेटवस्तू, पाहा व्हिडीओ.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूच्या तिरुमणी गावात झाला होता. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हापासून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा होत आहे. शिक्षक दिन जगातील 100 हून अधिक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो.