Photo Credit- X

Mumbai Indians: आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. ज्यामध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings)यांचा समावेश आहे. चौथ्या संघाने अद्याप प्लेऑफमध्ये प्रवेश केलेला नाही. ज्यासाठी मुंबई इंडियन्स एक प्रबळ दावेदार मानला जात आहे. सध्या, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. संघाने तीन परदेशी खेळाडूंच्या जागी नव्या खेळाडूंना संघात घेतले आहे. म्हणजेच आता मुंबईत 3 नवीन खेळाडू दाखल झाले आहेत. ज्यांनी मुंबईचा भाग म्हणून या हंगामात आधी सामना खेळला नव्हता.

'हे' खेळाडू मुंबई इंडियन्समध्ये सामील

खरं तर, भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी रद्द करण्यात आली. त्यानंतर उर्वरित सामने खेळण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतले. तसेच त्याच्या प्रतिबद्धतेमुळे ते पुढए खेळू शकणार नाहीत. काही खेळाडू पुन्हा भारतात परतले असले तरी, काही आयपीएलमध्ये परतू शकले नाहीत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या 3 खेळाडूंचा देखील समावेश आहे.

विल जॅक्स, रायन रिकोल्टन आणि कॉर्बिन बॉश यांच्या जागी आता संघाने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो, श्रीलंकेच्या चारिथ असलंका आणि रिचर्ड ग्लीसन यांना घेतले आहे. जर मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरला, तर हे तिन्ही खेळाडू प्लेऑफ टप्प्यापासून उपलब्ध असतील. Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? या मजेदार प्रश्नाचे उत्तर पहा

तिन्ही खेळाडूंची किंमत

इंग्लंडचा धडाकेबाज अष्टपैलू विल जॅक्सच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला 5.25 कोटी खर्च केले आहेत. याशिवाय, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला रायन रिकेलटनच्या जागी 1 कोटी रुपयांच्या किमतीत संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, कॉर्बिन बॉशच्या जागी चारिथ असलंकाला 75 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले आहे.