PC-X

Mitchell Marsh Hits Car: आयपीएल 2025 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जसजशी आयपीएल शेवटच्या टप्प्यात येत आहे. तसतशी अयपीएल (IPL 2025)हंगामातील चुरस वाढत चालली आहे. 61 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर मिचेल मार्शने (Mitchell Marsh) त्याच्या संघाला वेगवान सुरुवात दिली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर स्फोटक धावा केल्या आणि षटकारांचा पाऊस पाडला. सामन्यादरम्यान त्याने एक अनोखी कामगिरीदेखील केली. मिचेल मार्शने स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या कारवर सरळ षटकार मारला.

मिचेल मार्शची तुफानी खेळी

या सामन्यात मिचेल मार्शने लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरुवात दिली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. मिचेल मार्शने एकूण 39 चेंडूंचा सामना केला आणि 166.66 च्या सरासरीने 65 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

लखनौ सुपर जायंट्सच्या डावातील सहाव्या षटकात, मिचेल मार्शने इशान मलिंगाच्या षटकात जोरदार फलंदाजी केली. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर, मिचेल मार्शने एका लेंथ बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर एक लांब षटकार मारला. हा सिक्स थेट सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या टाटा कर्व्ह कारला धडकला. ज्यामुळे कारला डेंट आला.

त्यामुळे या सिक्सरची किंमत 5 लाख रुपये झाली. खरं तर, हंगामाच्या सुरुवातीला, टाटा मोटर्सने घोषणा केली होती की जर कोणताही फलंदाज थेट गाडीवर चेंडू मारला तर ते ग्रामीण क्रिकेट विकासासाठी 5 लाख रुपयांचे क्रिकेट किट दान करेल. अशा परिस्थितीत, मार्शचा हा सिक्स या उपक्रमाचा एक भाग बनला.