 
                                                                 IPL 2025: आयपीएल (IPL) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सोमवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटंन्सचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीचे(Digvesh Rathi) एका सामन्याचे निलंबन आणि त्याच्या सामन्याच्या शुल्काच्या 50% दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या संहितेचे उल्लंघन करण्याच्या गुन्ह्यासाठी तो दोषी आढळला. या हंगामात हा त्याचा तिसरा गुन्हा आहे. या ताज्या उल्लंघनामुळे दिग्वेशचे डिमेरिट पॉइंट पाच झाले आहेत, ज्यामुळे आयपीएल नियमांनुसार स्वयंचलितपणे एका सामन्याचे निलंबन झाले आहे.
दिग्वेशला यापूर्वी 1 एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात एक डिमेरिट पॉइंट मिळाला होता आणि 4 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आणखी दोन डिमेरिट पॉइंट मिळाले होते. सोमवारच्या घटनेमुळे दोन अतिरिक्त गुण मिळाले आहेत, ज्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे. परिणामी दिग्वेश राठी आता अहमदाबाद येथे होणाऱ्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या एलएसजीच्या आगामी सामन्याला मुकणार आहे.
दरम्यान, वादात हैदराबारचा अष्टपैलू अभिषेक शर्मा असल्याने त्यालाही दंड ठोठावण्यात आला आहे. शर्माला कलम 2.6 अंतर्गत लेव्हल 1 गुन्ह्यासाठी त्याच्या सामन्याच्या फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे. जो हंगामातील त्याचा पहिलाच उल्लंघन आहे. परिणामी 23 वर्षीय खेळाडूला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
राठीची अभिषेकशी शाब्दिक बाचाबाची
आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोठा शॉट मारण्यासाठी अभिषेक शर्मा गेला होता. पण अंतर गाठण्यात अयशस्वी झाला आणि शार्दुल ठाकूरने त्याला झेलबाद केले. मोठी विकेट घेतल्यानंतर, दिग्वेशने त्याचे नोटबुक सेलिब्रेशन केले आणि काहीतरी बोलला, ज्यावर अभिषेक संतापला आणि त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न केला. पंच आणि एलएसजी कर्णधार ऋषभ पंत यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
