
IPL 2025: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 2025 (IPL 2025) एका आठवड्यासाठी स्थगित केले होते. आता आयपीएलबाबत एक मोठी अपडेट आली आहे. जर भारत सरकारने हिरवा कंदील दिला तर आयपीएल 2025 स्पर्धा पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होऊ शकते. ज्यासाठी बीसीसीआयने आपला प्लॅन बी देखील तयार केला आहे. आयपीएल 2025 चे उर्वरित सामने तीन ठिकाणी खेळवता येतील. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने आयपीएल 2025 चे उर्वरित सर्व सामने तीन ठिकाणी खेळवण्याची योजना आखली आहे. बीसीसीआय बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये सामने आयोजित करण्याचा विचार करत आहे.
पुन्हा लवकर सुरु होणार आयपीएल
आयपीएल 2025 पुन्हा सुरू करण्याबाबत उद्या म्हणजेच 11 मे रोजी निर्णय घेतला जाऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारानंतर ही अपडेट आली आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानकडून होणारा गोळीबार थांबला आहे. यानंतर लगेचच, एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की आयपीएल 2025 स्पर्धा पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होऊ शकते. प्लेऑफ स्टेजपूर्वी स्पर्धेत अजून 13 सामने (पंजाब-दिल्ली सामन्यासह) खेळायचे आहेत.
हे देखील वाचा: IPL 2025 मध्ये मोडले 5 सर्वात मोठे विक्रम, तर वैभव-अभिषेक यांनी रचला इतिहास
आतापर्यंत किती सामने खेळले गेले आहेत?
आयपीएल 2025 मध्ये एकूण 57 सामने खेळले गेले आहेत. तर 58 वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात होता, जो पहिल्या डावाच्या पहिल्या 10 षटकांनंतर थांबवावा लागला. तथापि, हा सामना पुन्हा खेळवला जाईल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.