
IPL 2025 Five Big Records: भारत आणि पाकिस्तानच्या (IND vs PAK) सीमेवरील परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. हे लक्षात घेता, आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा सामना मध्येच थांबवण्यात आला. यानंतर, पाकिस्तानकडून देशाच्या अनेक भागात होत असलेल्या हल्ल्यांमुळे बीसीसीआयने तात्काळ हा सामना रद्द केला. दरम्यान, या हंगामात आतापर्यंत 58 सामने खेळले गेले आहेत. या हंगामात 5 मोठे विक्रम मोडले गेले. यादरम्यान, विराट कोहली आणि एमएस धोनी यांनीही मोठे विक्रम मोडून इतिहास रचला.
IPL 2025 मध्ये मोडले गेले 5 सर्वात मोठे विक्रम
विराट कोहली (Virat Kohli)
या हंगामात कोहलीने एक नवा विक्रम रचला. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याच्या बाबतीत कोहलीने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. कोहलीने 263 सामन्यांमध्ये 70 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

एम एस धोनी (MS Dhoni)
धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज या वर्षी काही खास कामगिरी करू शकलेला नाही. पण धोनीने एक नवीन विक्रम करून इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये यष्टींमागे 200 झेल घेणारा धोनी पहिला यष्टीरक्षक ठरला. धोनीच्या 200 झेलमध्ये 153 झेल आणि 47 स्टंपिंगचा समावेश आहे.

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi)
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने या हंगामात फक्त 35 चेंडूत शतक ठोकले. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता. पठाणने 37 चेंडूत शतक ठोकले होते.

अभिषेक शर्मा (Abhisekh Sharma)
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने या हंगामात एक मोठा विक्रम केला. अभिषेकने पंजाब किंग्जविरुद्ध 55 चेंडूत 141 धावांची खेळी केली. ही धावसंख्या कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने केएल राहुलचा विक्रम मोडला. राहुलने 2020 मध्ये 132 धावांची खेळी खेळली होती.

पंजाब किंग्ज (Punjab Kings)
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने इतिहास रचला. पंजाबने या हंगामात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला. पंजाबने कोलकाताला 111 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर, पंजाबने कोलकात्याला फक्त 95 धावांत गुंडाळून इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव नोंदवले.
