Kapil Dev With 1983 World Cup Title (Photo Credits: Twitter/ ICC)

India Made 183 in How Many Overs in the 1983 World Cup?: भारताने क्रिकेटच्या इतिहासात पहिला विश्वचषक 25 जून 1983 (1983 World Cup) साली जिंकला. हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात सूवर्णाक्षरात कोरला गेला. हा विजय एखाद्या उत्सवापेक्षा कमी नव्हता. हा तो दिवस होता जेव्हा टीम इंडियाने क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून जगाला आश्चर्यचकित केले होते. भारताच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सर्वांना ते चोख प्रत्यूत्तर होत. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर अंतिम सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारताने वेस्ट इंडिजसारख्या महान संघाला हरवून इतिहास रचला. हे सर्वांना माहित आहे. पाण आजच्या गुगलीचा प्रश्न विश्वचषकासंबंधीतच पण मोठा पेचात टाकणारा आहे. , "1983 च्या विश्वचषकात भारताने किती षटकांत 183 धावा केल्या होत्या?" असा हा प्रश्न आहे. त्याचे साधे उत्त 54.4 षटके आहे.

त्या काळात क्रिकेट आजच्यासारखे 50 षटकांचे नव्हते, ते 60 षटकांचे होते. भारतीय संघ पूर्ण 60 षटकेही खेळू शकला नाही आणि 54.4 षटकांत 183 धावांवर सर्वबाद झाला. Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या

सामन्यात भारताची कामगिरी

टीम इंडियाने आपल्या संयमाने आणि एकतेने ही छोटीशी धावसंख्या इतकी मजबूत केली की वर्ल्ड कप ट्रॉफी आपली झाली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. आपल्यासमोर वेस्ट इंडिजच्या भयानक गोलंदाजी हल्ला होता. ज्यामध्ये माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग आणि जोएल गार्नरसारखे स्फोटक गोलंदाज होते. पण भारतीय फलंदाजांनी हिंमत गमावली नाही आणि कशी तरी 183 धावांचा टप्पा गाठला.

त्यावेळी कोणाला विश्वास बसला नाही की भारत या स्कोअरवर जिंकेल. पण भारताच्या गोलंदाजांची भेदक कामगिरी फायद्याची ठरली आणि संपूर्ण वेस्ट इंडिज संघ फक्त 140 धावांवर गारद झाला. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला.

मोहिंदर अमरनाथला सामनावीर घोषित केले

मोहिंदर अमरनाथला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली, संघाने लॉर्ड्सच्या बाल्कनीतून ट्रॉफी उचलली. ते चित्र अजूनही प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या डोळ्यात ताजे आहे. या विजयामुळे भारतात क्रिकेट हा धर्म बनला. आज प्रत्येक गावात आणि प्रत्येक रस्त्यावर क्रिकेट खेळण्याची जी आवड दिसते, त्याचा पाया 1983 च्या या विजयाने घातला.