Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या

क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा द्विशतकांची चर्चा होते. तेव्हा,क्रिकेट चाहत्यांना सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग किंवा रोहित शर्मा अशी नावे आठवतात. पण तुम्हाला माहिती आहे का? एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला खेळाडू कोण होता?

Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
PC-X

Which Cricketer Scored the First ODI Double Century in 1997: क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा द्विशतकांची चर्चा होते. तेव्हा,क्रिकेट चाहत्यांना सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग किंवा रोहित शर्मा अशी नावे आठवतात. पण तुम्हाला माहिती आहे का? एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला खेळाडू कोण होता? एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला खेळाडू पुरूष होता की एक महिला होती? आणि ती ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क(Belinda Clark) होती. बेलिंडा क्लार्क हिने 16 डिसेंबर 1997 रोजी ही कामगिरी केली. महिला क्रिकेट विश्वचषकचा तो सामना होता. सामन्यात ऑस्ट्रेलियाचा महिला संघ डेन्मार्क विरुद्ध खेळत होता.

ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार बेलिंडा क्लार्क मैदानावर आली आणि तिने स्फोटक फलंदाजी केली. आजही क्रिकेटप्रेमींसाठी तो क्षण स्वप्नापेक्षा कमी नाही. बेलिंडाने फक्त 155 चेंडूत 22 चौकारांसह नाबाद 229 धावा केल्या होत्या. तिने एकटीने आपल्या संघाला 50 षटकांत 412/3 पर्यंत पोहोचवले.

ही खेळी खास का आहे?

बेलिंडा क्लार्कची 229 धावांची खेळी ही केवळ महिला क्रिकेटसाठीच नाही तर संपूर्ण क्रिकेट इतिहासासाठी एक मोठे पाऊल होते. कारण हे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक होते. हे यापूर्वी कोणीही, पुरुष असो वा महिला खेळाडूने केले नव्हते. सचिन तेंडुलकरनेही 2010 मध्ये, म्हणजे बेलिंडाच्या 12 वर्षांनंतर, पहिले द्विशतक झळकावले.

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2025 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).