PC-X

Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: लखनौच्या एकाना स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद संघाने सामना जिंकला सामन्या फलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरली. एकतर्फी झालेल्या सामन्यात हैदराबादने लखनौचा 6 गडी राखून पराभव केला. अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) बॅटींग करताना. सामन्यात 20 चेंडूमध्ये 59 धावांची जलद खेळी केली. अभिषेकचा डाव दिग्वेश राठीने (Digvesh Rathi )संपवला. विकेट घेतल्यानंतर दिग्वेशच्या नोटबूक सेलिब्रेशनमुळे अभिषेक संतापला त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. मैदानाच्या मध्यभागी दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर संघांच्या खेळाडूंना आणि पंचांना हस्तक्षेप करावा लागला. या हाय-व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

अभिषेक दिग्वेशवर का भडकला?

अभिषेक शर्माने शानदार फलंदाजी केली होती आणि त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. अभिषेकने 19 चेंडूत 295 च्या स्ट्राईक रेटने 59 धावा केल्या. अभिषेकला रोखण्यासाठी कर्णधार पंतने चेंडू दिग्वेशकडे सोपवला आणि अभिषेकच्या वादळी खेळीचा शेवट केला. विकेट मिळताच दिग्वेशने त्याचे नोटबुक सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. हे अभिषेकला अजिबात आवडले नाही. अभिषेक संतापला आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. परिस्थिती बिकट होत चालली आहे हे पाहून खेळाडू आणि पंचांना हस्तक्षेप करावा लागला.

'केस पकडून मारेन'

अभिषेक आणि दिग्वेशचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या मते, अभिषेकने दिग्वेशचे केस पकडून त्याला मारहाण करण्याचे संकेतही दिले. या भांडणासाठी अभिषेक-दिग्वेश यांना मोठा दंडही भरावा लागू शकतो. सनरायझर्स हैदराबादने एकतर्फी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला.