IND vs SL (Photo Credit- X)

IND vs SL Asia Cup 2025: आशिया कप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ग्रुप स्टेजमधील दमदार सामन्यानंतर आता सुपर-४ स्टेजचा शेवट होणार आहे. सुपर-४ स्टेजचा शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळला जाईल. यंदाच्या आशिया कपमधील दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना असेल. टीम इंडियाने यापूर्वीच फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. दुसरीकडे, श्रीलंका आपला शेवटचा विजय मिळवून स्पर्धेचा शेवट करण्यासाठी मैदानात उतरेल. IND vs SL: अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध लढत, जाणून घ्या दोन्ही संघाची आकडेवारी

भारत-श्रीलंका लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर-४ मधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल. टीम इंडियाने सुपर-४ मधील आपले दोन्ही सामने याच मैदानावर खेळले आहेत. या सामन्यासाठी टॉस भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता होईल, तर सामना रात्री ८:०० वाजता सुरू होईल. विजयरथावर स्वार झालेल्या टीम इंडियाचा प्रयत्न या विजयासह फायनलमध्ये प्रवेश करण्याचा असेल.

कुठे पाहणार सामना?

भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टेन १, सोनी स्पोर्ट्स टेन १ एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन ५ आणि सोनी स्पोर्ट्स टेन ५ एचडी या चॅनेल्सवर होईल. याशिवाय, सोनी स्पोर्ट्स टेन ३ वर हिंदी, सोनी स्पोर्ट्स टेन ३ एचडी वर हिंदी तसेच सोनी स्पोर्ट्स टेन ४ वर तमिळ आणि तेलुगू भाषेत सामन्याचे प्रक्षेपण उपलब्ध असेल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्ह (SonyLIV) ॲपवर पाहता येईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

श्रीलंका: चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, नुवानीदु फर्नांडो, कामिंडु मेंडिस, कामिल मिशारा, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षाना, दुशमंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, मथीशा पथिराना.

टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.