
Team India New T20I Record: दुबईमध्ये झालेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. तिलक वर्मा, कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताला ही ट्रॉफी जिंकता आली. पाकिस्तानने विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारतीय संघाने शेवटच्या षटकात पूर्ण केले. पाकिस्तानविरुद्धचा हा विजय केवळ एक सामना नव्हता, तर भारताने एक मोठा जागतिक विक्रम रचला. Abrar Ahmed Troll: अर्शदीप, जितेश आणि हर्षितने घेतली अबरार अहमदची मजा, व्हिडिओ पाहून तुम्हीलाही हसू अवरणार नाही
Raw emotions 🔥
What it means to win for #TeamIndia 🇮🇳
Scoreboard ▶️ https://t.co/0VXKuKPkE2#AsiaCup2025 | #Final pic.twitter.com/3gml0uDqe9
— BCCI (@BCCI) September 28, 2025
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, भारताने पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना १००% विजयाचा विक्रम कायम ठेवला आहे. आतापर्यंत, भारताने पाकिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना एकही सामना गमावलेला नाही, आणि हा भारताचा नववा विजय आहे. याबाबतीत भारताने मलेशियाचा विक्रम मोडला, ज्यांनी थायलंडविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना ८ सामने जिंकले होते.
आशिया कपमध्ये भारताचा ५० वा विजय
भारतीय क्रिकेट संघ आशिया कपमध्ये (टी-२० आणि वनडे दोन्ही फॉरमॅट मिळून) ५० सामने जिंकणारा पहिला संघ बनला आहे. वनडे आशिया कपमध्ये भारताने ३५, तर टी-२० आशिया कपमध्ये १५ सामने जिंकले आहेत.
खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी
पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात कुलदीप यादवने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांमध्ये ३० धावा देऊन चार विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याच्याशिवाय अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनीही चांगली गोलंदाजी केली. नंतर फलंदाजी करताना तिलक वर्माने ६९ धावांची शानदार खेळी केली, ज्यासाठी त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला.