Home Ministry

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) आता भारत-पाक युद्धाचे ढग गडद होताना दिसत आहेत. भारताकडून या हल्ल्याचा जसाच तसा बदला घेतला जाईल अशी घोषणा केल्यानंतर आता केंद्राने 7 मे दिवशी राज्यांनी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. २२ एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, "शत्रू हल्ल्याच्या प्रसंगी प्रभावी नागरी संरक्षण" करण्यासाठी हे मॉक ड्रिल (Civil Defence Mock Drill) आवश्यक असल्याचं सांगण्यात आले आहे. जर हल्ला झाला तर नागरिकांनी काय करणं अपेक्षित आहे? याची माहिती देण्यासाठी हे मॉक ड्रिल्स घेतलं जातं. यामध्ये नागरिकांनी घाबरून जाण्याची मूळीच गरज नाही.

भारतात यापूर्वी मॉक ड्रिल झाले होते का?

केंद्राकडून मॉक ड्रिलची देण्यात आलेली माहिती ही अत्यंत नाजूक वेळ आहे. अशा प्रकारे मॉक ड्रिल यापूर्वी 1971 मध्ये झाले होते. 1971 ला देखील भारत-पाकिस्तान युद्ध झाले होते.

7 मे दिवशी काय होऊ शकतं?

7 मे 2025 दिवशी राष्ट्रीय स्तरावर सिव्हिल डिफेंस रिहर्सल 244 Civil Defence districts मध्ये होऊ शकते. यासाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या सरावाचे आयोजन आणि देखरेख करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये स्थानिक सरकारी अधिकारी, नागरी संरक्षण वॉर्डन, होमगार्ड्स, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) सदस्य आणि शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होतील.

हवाई हल्ल्यासाठी सायरन

असुरक्षित शहरी केंद्रे आणि प्रतिष्ठानांमध्ये सायरनची चाचणी केली जाईल आणि ते सक्रिय केले जातील. या अलार्म सिस्टीम लोकांना हवाई धोक्यांबद्दल सतर्क करतात, ज्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी मदत होणार आहे.

नागरिकांना प्रशिक्षण

शाळा, कार्यालये आणि सामुदायिक केंद्रांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जातील. सहभागींना हल्ल्यादरम्यान कसे प्रतिसाद द्यायचे ते शिकायला मिळेल. यामध्ये ड्रॉप-अँड-कव्हर तंत्रे, जवळील आश्रयस्थाने शोधणे, मूलभूत प्रथमोपचार आणि तणावाखाली शांत राहणे.

क्रॅश ब्लॅकआउट्स

शहरे अचानक ब्लॅकआउट्स करू शकतात. रात्रीच्या वेळी होणाऱ्या संभाव्य हवाई हल्ल्यांदरम्यान ओळख टाळण्यासाठी सर्व दृश्यमान दिवे बंद होऊ शकतात. ही युक्ती शेवटची 1971 च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणात वापरली गेली होती.

Evacuation Drills

अधिकारी Evacuation Drills चा सराव करतील, उच्च-जोखीम असलेल्या झोनमधून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवतील. या ड्राय रनमुळे अडचणी ओळखण्यास आणि वास्तविक आपत्कालीन परिस्थितीत सुरळीत ऑपरेशन सुनिश्चित करण्यास मदत होईल.

Cold War-era drills पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केवळ प्रतीकात्मक नाही. तो एका व्यापक धोरणाचे संकेत देतो - राष्ट्रीय संरक्षण युद्धभूमीच्या पलीकडे जात असल्याचं यामधून सांगितलं जातं. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना काय करावे, केव्हा करावे आणि शांत कसे राहावे हे माहित असते, तेव्हा देशाची एकूण लवचिकता अधिक मजबूत होते. त्यामुळे या मॉक ड्रिलची आखणी करण्यात आली आहे.