PM Modi | X @ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. पॅट्रिक हेर्मिनी यांचे सेशेल्समधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.हिंदी महासागराचे पाणी ही एक सामायिक वारसा आहे जो दोन्ही राष्ट्रांच्या लोकांना एकत्र आणतो आणि त्यांच्या आकांक्षा आणि गरजांना पाठिंबा देतो असे, पंतप्रधान म्हणाले.

डॉ. हेर्मिनी यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत आणि सेशेल्समधील काळाच्या कसोटीवर उतरलेले आणि बहुआयामी संबंध अधिक दृढ होतील तसेच त्यांना आणखी गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एक्सच्या माध्यमातून पंतप्रधानांनी पोस्ट केले की:

“सेशेल्समधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल डॉ. पॅट्रिक हेर्मिनी यांचे हार्दिक अभिनंदन. हिंदी महासागराचे पाणी हा आपला सामायिक वारसा आहे आणि आपल्या लोकांच्या आकांक्षा आणि गरजांची पूर्तता करते. मला विश्वास आहे की राष्ट्राध्यक्षपदाच्या त्यांच्या कार्यकाळात आपले काळाच्या कसोटीवर उतरलेले आणि बहुआयामी संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांना आणखी गती मिळेल. त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा.”