
Bhaubeej 2025 Messages: दिवाळीतील पाच दिवसांच्या उत्सवातील शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज (Bhaubeej). बहिण-भावाच्या अतूट आणि पवित्र नात्याचे प्रतीक असलेला हा दिवस आहे. या दिवसाला 'यमद्वितीया' असेही म्हटले जाते. आजच्या दिवशी यमदेव (मृत्यूची देवता) आपली बहीण यमी (यमुना नदी) हिच्या घरी भोजनासाठी गेला होता, म्हणून या तिथीला 'यमद्वितीया' म्हणतात. या दिवशी यमुनेमध्ये स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्या व्यक्तीला त्या वर्षभर यमदेवापासून भय नसते, अशी धार्मिक धारणा आहे.
सणामागील भावना
हा सण बंधू-भगिनींमधील प्रेमाचे संवर्धन करणारा आहे. द्वितीयेचा चंद्र जसा वाढ दर्शवतो, तसेच बीजेच्या कोरीप्रमाणे (द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे) बहिण-भावाच्या प्रेमाचे वर्धन होत राहो, ही या सणामागची मुख्य भूमिका आहे. अशा या खास आणि प्रेमळ दिवशी तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला मराठी Messages, Greetings, Quotes, HD Images, Wishes, Wallpapers शेअर करून भाऊबीजेच्या प्रेमळ शुभेच्छा देऊ शकता.
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
नात्यामध्ये राहू दे स्नेह आणि आपुलकीची माया
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या लाडक्या भावाला
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊबीज साजरी करण्याची पद्धत
- भोजन: या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन गोडधोड भोजन करतो.
- ओवाळणी: सायंकाळी आकाशात चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्रकोरीस आणि नंतर आपल्या भावाला ओवाळते.
- भेटवस्तू: ओवाळणी झाल्यावर भाऊ प्रेमाची भेटवस्तू (Gift) बहिणीला देतो.