IND vs PAK Asia Cup 2025: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर टीम इंडियाने दुबईच्या मैदानातही पाकिस्तानचा धुव्वा उडवला. आशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात सूर्यकुमारच्या संघाने पाकिस्तानला ७ विकेट्सने धूळ चारली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतीय फिरकी गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. २० षटकांत ९ विकेट्स गमावून त्यांना केवळ १२७ धावा करता आल्या. या लहान लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने केवळ ३ विकेट्स गमावून हा सामना सहज जिंकला. अभिषेक शर्माने १३ चेंडूत ३१ धावांची धमाकेदार खेळी केली, तर तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही फलंदाजीमध्ये कमाल दाखवली. हा भारताचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे.
2⃣ wins on the bounce for #TeamIndia! 🙌
A dominating show with bat & ball from Surya Kumar Yadav & Co. to bag 2 more points! 👏 💪
Scorecard ▶️ https://t.co/W2OEWMTVaY#AsiaCup2025 pic.twitter.com/hM7iin7AAq
— BCCI (@BCCI) September 14, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)